शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

इम्तियाज जलील लोकसभेऐवजी विधानसभाच लढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:56 IST

वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेची जागा एमआयएमने हिसकावून घेतल्यानंतर विद्यमान आमदार इम्तियाज जलील हे संभाव्य उमेदवार राहतील, अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच स्वत: जलील यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी लोकसभेऐवजी विधानसभाच लढणार असल्याचे आज ‘लोकमत’जवळ स्पष्ट केले. आता एमआयएमची उमेदवारी कुणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

स.सो. खंडाळकरऔरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेची जागा एमआयएमने हिसकावून घेतल्यानंतर विद्यमान आमदार इम्तियाज जलील हे संभाव्य उमेदवार राहतील, अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच स्वत: जलील यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी लोकसभेऐवजी विधानसभाच लढणार असल्याचे आज ‘लोकमत’जवळ स्पष्ट केले. आता एमआयएमची उमेदवारी कुणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.ही जागा एमआयएमला सुटावी यासाठी जलील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हैदराबाद गाठून एमआयएमचे सुप्रिमो असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली. एक आमदार व २५ नगरसेवक असलेल्या पक्षाने निवडणूक न लढणे कसे चुकीचे ठरेल, हे त्यांनी पटवून दिले. त्यानंतर वेगाने घडामोडी घडल्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या २२ उमेदवारांची नावे असलेल्या यादीतील माजी न्या. बी.जी. कोळसे पाटील यांचे नाव ३७ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत कटले. त्यांतर अ‍ॅड. बाळसाहेब आंबेडकर यांनी ही जागा एमआयएम लढवेल, असे घोषित केले.एमआयएमतर्फे आ. इम्तियाज जलील हे लोकसभा निवडणूक लढणार, असे जाहीर झाल्यानंतर विविध तर्कवितर्क सुरू झाले. मुस्लिम समाजातही खळबळ उडाली. मुस्लिम समाजातील बुद्धिजीवी वर्गाने जलील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवायला सुरुवात केली. एमआयएमचे कार्यकर्तेही जलील यांनी विधानसभाच लढवावी, असा आग्रह धरू लागले.एमआयएमने देशभरात लोकसभा निवडणुका लढवायच्याच नाहीत, असा धोरणात्मक निर्णय झाला होता. मुस्लिम धर्मगुरूंनीही तशीच सूचना ओवेसी यांना केली होती. त्यामुळेच ओवेसी यांनी, बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुका लढवण्यासंबंधीचे अधिकार वंचित बहुजन आघाडीला देत एमआयएम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली होती. असे असतानाही औरंगाबादच्या जागेचा आग्रह एमआयएमने धरला. औरंगाबादसह मुंबईतील एक जागा एमआयएम लढेल, असे जाहीर झाले. लोकसभा लढल्यास तुम्ही मोदींना मदत करीत आहात, असा संदेश जाईल, म्हणून अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी ओवेसींना हितोपदेश केला होता, हे येथे उल्लेखनीय.खरे तर एमआयएम व वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी असतानाही या दोन पक्षांत म्हणावे तसे मनोमिलन किंवा एकीची भावना बळावलेली दिसत नाही. औरंगाबादच्या वंचित बहुजन आघाडीत जिल्हा कार्यकारिणीवरून धुसफूस सुरू झाली आहे. सुनील वाघमारे यांनी नेमलेल्या कार्यकारिणीवर अनेकांनी अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण यांनी नुकतीच सुवर्णशिल्पमध्ये झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. एमआयएमला जागा सुटली असली तरी वंचित बहुजन आघाडीचा एखादा उमेदवार येथे उभा राहू शकेल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

टॅग्स :ParliamentसंसदElectionनिवडणूकAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन