२५ कोटींचे महत्त्वपूर्ण प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:32 IST2017-09-09T00:32:17+5:302017-09-09T00:32:17+5:30
अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या २५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केल्याने आता यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यात शहरात महत्त्वपूर्ण बाबींना प्राधान्य देण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले.

२५ कोटींचे महत्त्वपूर्ण प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या २५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केल्याने आता यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यात शहरात महत्त्वपूर्ण बाबींना प्राधान्य देण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले.
ते म्हणाले, हिंगोली शहराची सांस्कृतिक चळवळीची परंपरा आहे. मात्र त्या तोडीचे नाट्यगृह, कल्याण मंडपम्वगळता सभागृहही नाही. त्यामुळे एनटीसी भागात भव्य नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. याच ठिकाणी जलतरणिकेचाही प्रस्ताव असून शहरवासियांना खºया अर्थाने आल्हाद देणारे उद्यान उभारण्यात येणार आहे. या तिन्ही बाबींना १0 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्याचबरोबर एकेकाळी शहराचे वैभव राहिलेल्या शिवाजीराव देशमुख सभागृहाचे ३ कोटींचे काम होणार आहे. नगरपालिकेची स्वतंत्र व सुसज्ज इमारतही आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे जागेची मागणी केलेली आहे. तर यात ४ कोटींचा प्रस्तावही दिला आहे. हिंदूंच्या स्मशानभूमिचे सुशोभिकरण करण्याचा ३ कोटींचा प्रस्ताव आहे. याशिवाय मंगळवारा भागात शेतकी भवनासाठी १ कोटींचा प्रस्ताव आहे. तर शहरातील नांदेड नाका ते अंबिका टॉकिजपर्यंत रस्त्यावर दुभाजक व सुशोभिकरणास दीड कोटींचा प्रस्तावही दिला आहे. इतरही काही बाबी या २५ कोटींत आहेत. याशिवाय जलेश्वर तलाव व सिरेहक शाह तलाव सुशोभिकरण व विकासासाठी १४ कोटींचा प्रस्तावही मंजुरीसाठी प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.