जादूच्या कांडीचा जिल्ह्यावर असायचा प्रभाव
By Admin | Updated: June 4, 2014 01:29 IST2014-06-04T00:31:14+5:302014-06-04T01:29:00+5:30
बीड: देश पातळीवर बीड जिल्ह्याचे सक्षम नेत्तृत्व म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पाहिले जाते.

जादूच्या कांडीचा जिल्ह्यावर असायचा प्रभाव
बीड: देश पातळीवर बीड जिल्ह्याचे सक्षम नेत्तृत्व म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. सामान्यातल्या सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांनी केलेली विकास कामे आज ही बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या स्मरणात आहेत. बीड परळी हा मार्ग गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना केला. यामार्गाला मुंडे हायवे असे नाव पडलेले आहे. आपल्याकडे आलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी कधीही निराश करून परत पाठविलेले नाही. अनेक गावचे कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे विकास कामासाठी निधी मागण्यासाठी जायचे. मात्र गेलेल्या प्रत्येक कार्यकत्याचे समाधान त्यांनी केले. कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडा प्रमाणे सांभाळल्याने मुंडेच्या भोवती सतत कार्यकर्त्यांचा गराडा असायचा. बीएसएनएल ची सेवा देशात सर्वात अगोदर बीड जिल्ह्यातील परळी येथून सुरू केली. यामध्ये गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांचा मोठा सहभाग होता. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी मुंडे नेहमी प्रयत्नशील असायचे. जिल्ह्यातील त्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरगुती कार्यक्रमाला देखील मुंडेची आवर्जून हजेरी असायची. जिल्ह्यातील दुष्काळगस्त शेतकर्यांसाठी अनुदानाची मागणी असो की, जिल्ह्याच्या पाण्याचा, विजेचा प्रश्न असो. यासाठी मोठमोठे आंदोलने करून जनसामान्यांना कायम आधार दिलेला आहे. अशा कणखर नेत्तृत्वाच्या अकाली जाण्याने बीड जिल्हाच नव्हे तर उभा महाराष्ट्र पोरका झालेला आहे. बीड जिल्ह्यातील मुंडे देश पातळीवर नेत्तृत्व करत होते याचा अभिमान जिल्ह्यातील प्रत्येकाला वाटायचा. गोपीनाथ मुंडेच्या अकाली निधनाने मात्र बीड जिल्हा शोककळेत डुबला आहे. याचा प्रत्यय मंगळवारी आला. (प्रतिनिधी)