दुष्काळी परिस्थितीचा दूध संकलनावर परिणाम

By Admin | Updated: May 12, 2015 00:48 IST2015-05-12T00:08:24+5:302015-05-12T00:48:31+5:30

जालना : उन्हाचा फटका सर्वांनाच बसत आहे. उन्हाळ्यात दूध संकलनात कमालीची घट आली आहे. आज रोजी दिवसाकाठी दोन ते अडीच हजार एवढे दूध संकलित होत आहे.

Impact of drought-like milk collection | दुष्काळी परिस्थितीचा दूध संकलनावर परिणाम

दुष्काळी परिस्थितीचा दूध संकलनावर परिणाम


जालना : उन्हाचा फटका सर्वांनाच बसत आहे. उन्हाळ्यात दूध संकलनात कमालीची घट आली आहे. आज रोजी दिवसाकाठी दोन ते अडीच हजार एवढे दूध संकलित होत आहे. चारा व पाणीटंचाईमुळे बहुतांश पशुपालकांनी जनावरांची विक्री सुरु केली आहे. परिणामी धवलक्रांतीला लगाम लागल्यााचे चित्र आहे.
सर्वसाधारण जिल्ह्याची दूध उत्पादन क्षमता प्रतिदिन २ लाख ३० हजार एवढी आहे. हॉटेल,घरगुती वापरसाठी मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री होते. त्यामुळे शासनाकडे होणारे दूध संकलन अत्यल्प असे आहे. खाजगी दूध संस्थांमधूनही बऱ्यापैकी दूध संकलित होत आहे. दुग्धोत्पादकांना शासनातर्फे १८.५ रूपये प्रति लिटरचा भाव दिला जातो. मात्र बोटावर मोजण्या इतकेच दूध उत्पादक शासनाकडे दुधाची विक्री करतात. बहुतांश दूध उत्पादक खाजगी कंपन्यांकडे दुधाची विक्री करतात.
काही वर्षांपासून दुष्काळ जिल्ह्याची पाठ सोडत नसल्याने शेतीसह सर्वच उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम होत आहे. दुष्काळामुळे पाणी व चाऱ्याची सोय होत नसल्याने पशुपालक जनावरांची विक्री करण्यावर भर देतात. याचा फटका दूध उत्पादनावर होऊन संकलनावर होतो. जनावरांना पोषक आहार मिळत नसल्याने त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. जिल्ह्यात दूध संकलन कमी असल्याने नगर, सोलापूर, कोल्हापूर येथून खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात जिल्हाला दूधाचा पुरवठा करतात.
जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. विविध योजना आहेत. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा योग्य फायदा घेण्याची गरज अधिकारी व्यक्त करतात. (प्रतिनिधी)

Web Title: Impact of drought-like milk collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.