मी शेवटच्या श्वासापर्यंत रिपब्लिकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST2020-12-30T04:07:13+5:302020-12-30T04:07:13+5:30
औरंगाबाद : मी शेवटच्या श्वासापर्यंत रिपब्लिकनच राहणार, अशी ग्वाही रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ...

मी शेवटच्या श्वासापर्यंत रिपब्लिकन
औरंगाबाद : मी शेवटच्या श्वासापर्यंत रिपब्लिकनच राहणार, अशी ग्वाही रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे दिली. काही मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतात; परंतु रिपब्लिकन ही ओळख पुसून टाकत आहेत, अशी टीकाही त्यांनी नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली.
रिपाइं (ए) च्या मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात आयोजित मराठवाडा विभागीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
येत्या २६ जानेवारीपर्यंत पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम संपली पाहिजे. जे नोंदणी करणार नाहीत, त्या पदाधिकाऱ्यांना बदलण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
भाजपबरोबर आपली युती आहेच. त्यात ज्या जागा मिळतील, त्यावर आपण लढूच; परंतु जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची चांगली तयारी करा, असा सल्ला आठवले यांनी दिला.
प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जिल्हा अध्यक्ष संजय ठोकळ यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद शेळके, पप्पू कागदे, ब्रम्हानंद चव्हाण, देवीदास कांबळे, मिलिंद जोशी, दिवाकर माने, संजय बनसोडे (उस्मानाबाद), एन. जी. दाभाडे (परभणी) आदींची यावेळी भाषणे झाली. व्यासपीठावर दौलत खरात, विजय मगरे, पुंजाराम जाधव, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमोल आदींची उपस्थिती होती.
कॅप्शन..
रिपाइंच्या मराठवाडा विभागीय बैठकीत मार्गदर्शन करताना रामदास आठवले. व्यासपीठावर पक्षाची इतर नेतेमंडळी.