मी डॉक्टर होणारच...!

By Admin | Updated: June 7, 2014 00:20 IST2014-06-06T23:45:54+5:302014-06-07T00:20:14+5:30

सोमनाथ खताळ, बीड लहानपणापासूनच मला वैद्यकीय शिक्षणाविषयी ओढ होती. शालेय शिक्षण घेत असतानाच मी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते.

I'm going to be a doctor ...! | मी डॉक्टर होणारच...!

मी डॉक्टर होणारच...!

सोमनाथ खताळ, बीड
लहानपणापासूनच मला वैद्यकीय शिक्षणाविषयी ओढ होती. शालेय शिक्षण घेत असतानाच मी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. आज सीईटीचा निकाल लागला आणि माझ्या स्वप्नांच्या दिशेने जाण्याचा मार्ग मला सापडला आहे. या निकालामुळे मला खूप आनंद झाला आहे, असे राज्यातील वैद्यकीय सीईटी परीक्षेत एन.टी. ड प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेला व खुल्या प्रवर्गातून राज्यात सातव्या क्रमांकावर आलेला गोविंद सानप ‘लोकमत’शी बोलताना अभिमानाने सांगत होता़ यावेळी आपण डॉक्टर होणारच.! असा विश्वासही त्याने यावेळी बोलून दाखविले.
माणसाच्या अंगी जिद्द असली की कोणतीच गोष्ट अशक्य नसते, हे बीडच्या गोविंद सानप या बारावीच्या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे़ वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंडळाने घेतलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय प्रवेश परिक्षेत गोविंद अजिनाथ सानप याने ६६० गुण मिळवून घवघवीत यश मिळविले आहे़ त्याच्या या यशाबद्दल त्याच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला, यावेळी गोविंद सानप मोठ्या आत्मविश्वासाने आणि अभिमानाने बोलत होता़
मूळचा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगावघाट येथील मी रहिवासी आहे़ लहानपणापासूनच प्रत्येक क्षेत्रात मला आवड आहे़ दहावी पर्यंत बीडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मला वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवायचेच हे उद्दिष्ट मी डोळ्यासमोर ठेवले़ त्यामुळे मी लातूरच्या राजर्षी शाहु महाविद्यालयात प्रवेश घेतला़ माझ्या मनाविरूद्ध न जाता वडील अजिनाथ व आई चतुराबाई यांनीही माझा लातुरच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला़ अकरावी आणि बारावीत असतानाचा मी सीईटीचा मन लाऊन अभ्यास केला आणि मी अभ्यासरूपी घेतलेल्या मेहनतील अखेर यश मिळाले असल्याचे गोविंद सांगत होता़ या वैद्यकीय परीक्षेत गोविंदने ६६० गुण मिळवून एनटी ड प्रवर्गातून राज्यात पहिला तर खुल्या प्रवर्गातून राज्यात सातव्या क्रमांकावर आहे़ बारावीच्या परीक्षेतही त्याने ९२.१५ टक्के मिळवून उत्कृष्ट यश मिळविले आहे़
पहिल्यापाूनच हाती यशाची चावी
सातवीत महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातून अठरावा, आठवीत एनटीएसई मध्ये पहिल्या श्रेणीत राज्यात पहिला तर दहावीच्या परीक्षेत ९८.३१ टक्के घेऊन औरंगाबाद बोर्डातून पहिला आला होता़ त्याची ही यशाची वाटचाल सुरूच आहे़
गोविंदला आयएएस अधिकारी करायचंय!
गोविंद हा लहाणपणापासूनच अभ्यासात खुप हुशाऱ लहाणपणी आयआयटी मध्ये जाण्याचा हट्ट धरणारा गोविंद डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतोय़ हे त्याचे स्वप्न पुर्ण हेणारच आहे शिवाय आम्हाला त्याला आयएएस अधिकारी बनवायचंय असे गोविंदचे आई-वडील चतुराबाई अजिनाथ सानप हे सांगत होते़
दादा आणि वहिनीच माझे गुरू
आपल्या अभ्यासातून आणि कामातून वेळ काढत वहिनी पुनम आणि दादा रामदास यांनीही मला मोलाचे मार्गदर्शन केले़ त्यांनी मला वेळोवेळी अडीअडचणीत मदत केली़ तेच माझे गुरू आहेत़
यांना दिले यशाचे श्रेय
आपल्याला अभ्यास करीत असताना अनेक अडचणी आल्या़ मात्र आई-वडिलांचे प्रोत्साहन, गुरूजनांची शिकवण व मित्र-मैत्रीणींचे सहकार्य यांच्यामुळे मी प्रत्येक अडचणीला मोठ्या हिंमतीने सामोरे गेलो़ माझ्या या यशाचे सर्व श्रेय मी या तीन व्यक्तींनाच देऊ इच्छीतो, असेही गोविंदने सांगितले़

Web Title: I'm going to be a doctor ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.