गुटख्याची अवैधरित्या वाहतूक; दुचाकीसह माल जप्त

By Admin | Updated: May 18, 2014 00:27 IST2014-05-18T00:21:39+5:302014-05-18T00:27:04+5:30

हिंगोली : शहरातील कळमनुरी रस्त्यावरील खटकाळी भागात वाहनावरून अवैधरित्या नेला जात असलेला गुटखा पोलिसांनी पकडला आहे.

Illegal transportation of gutka; Bike seized goods | गुटख्याची अवैधरित्या वाहतूक; दुचाकीसह माल जप्त

गुटख्याची अवैधरित्या वाहतूक; दुचाकीसह माल जप्त

 हिंगोली : शहरातील कळमनुरी रस्त्यावरील खटकाळी भागात वाहनावरून अवैधरित्या नेला जात असलेला गुटखा पोलिसांनी पकडला आहे. १७ मे रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या कारवाईदरम्यान दोघेजण दुचाकी वाहन व माल जाग्यावरच सोडून पळून गेले. हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षभरात अनेक ठिकाणी शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची अवैधरित्या विक्री होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. परंतु या आरोपींविरूद्ध ठोस कारवाई होत नसल्याने हे प्रकार बंद झालेले नाहीत. उलट परजिल्ह्यातून माल आणून विकला जात आहे. दोन दिवसांपर्वीच वसमत शहरात गुटख्याचा मोठा साठा रेल्वेमधून जप्त करण्यात आला. गेल्या वर्षी हिंगोली शहरात बनावट गुटखा कारखाना सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. दिवसेंदिवस गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, १७ मे रोजी फौजदार गजानन पाटेकर यांच्या पथकाने शहरातील कळमनुरी रस्त्यावर खटकाळी प्रवासी निवार्‍यासमोर वाहनांची तपासणी सुरू केली असता दुचाकी क्र. एम.एच.३८ एच-२६७८ वरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिसांना पाहून वाहन व त्यावर बांधलेले पोती तेथेच टाकून पळ काढला. पोलिसांनी सदरील वाहनावरील पोती उघडून पाहिले असता त्यामध्ये शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी सदरील दुचाकीसह पोते जप्त केले आहे. याप्रकरणी परभणीच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी सचिन केदारे यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी आरोपींविरूद्ध कलम २७२, २७३, ३२८, १८८ भादंवि, अन्न सुरक्षा व मानके कायदा २०११ च्या कलम २६ (२) (१) व २६ (२) (४) सह कलम ३ (१) (झेड झेड) (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या पोत्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला सितार मावा व विमल सेन्टेड तंबाखूचा ३ हजार ५०० रूपयांचा माल आढळून आला आहे. चोरटी विक्री करण्याच्या उद्देशानेअ वैधरित्या नेल्या जात असलेल्या या मालासह २० हजार रूपये किमतीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक सुनील लांजेवार, पोलिस निरीक्षक शंकर सिटीकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जी.जी.पाटेकर करीत आहेत. हिंगोलीत पोलिसांची कारवाई खटकाळी येथील प्रवासी निवार्‍या समोर वाहनांची तपासणी करीत असताना आढळून आला गुटखा अनोळखी व्यक्तींनी पोलिसांना पाहताच मोटारसायकल सोडून काढला पळ पोलिसांनी दुचाकीसह गुटख्याचे दोन पोते केले जप्त अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे कडक कारवाई होत नसल्याने अवैध गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. परभणी येथील या विभागाच्या अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष गुटख्याची दुपटीपेक्षा अधिक दराने काळ्या बाजारात विक्री

Web Title: Illegal transportation of gutka; Bike seized goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.