माजलगावात अवैध वाळूचा ट्रक जप्त
By Admin | Updated: April 29, 2017 23:22 IST2017-04-29T23:20:16+5:302017-04-29T23:22:04+5:30
माजलगाव : जालना जिल्ह्यातील घाटावरुन वाळू उपसून विनापरवाना वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी पकडला.

माजलगावात अवैध वाळूचा ट्रक जप्त
माजलगाव : जालना जिल्ह्यातील घाटावरुन वाळू उपसून विनापरवाना वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी पकडला. तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
भाऊसाहेब संदीप वरकडे, अशोक मोहन भोसले (दोघे रा. देवगाव ता. भूम, जि. उस्मानाबाद), अरुण अंबादास कचरे (रा. राजेगाव ता. माजलगाव) यांचा आरोपींत समावेश आहे. गुंज (जि. जालना) येथील नदीपात्रातून चार ब्रास वाळू (एमएच १४- ८८५४) मधून घेऊन विनापरवाना माजलगावमार्गे घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी शहरातवळील एका पेट्रोलपंपावर सापळा लावला. वाळूसह ट्रक असा सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (वार्ताहर)