गोदावरी पात्रातून दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:05 IST2020-12-30T04:05:46+5:302020-12-30T04:05:46+5:30

वीरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येणाऱ्या अनेक गावांतून गेलेल्या गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सध्या बांधकामासाठी ...

Illegal sand extraction started from Godavari basin in broad daylight | गोदावरी पात्रातून दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा सुरू

गोदावरी पात्रातून दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा सुरू

वीरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येणाऱ्या अनेक गावांतून गेलेल्या गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सध्या बांधकामासाठी वाळूचा तुटवडा असल्याने वाळूला सोन्याचा भाव आला आहे; मात्र यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कांदा, गहू, हरभरा, ऊस या पिकांवर या अवैध वाळू वाहतुकीचा मोठा परिणाम होत आहे. आजूबाजूच्या शेतातील पिकांवर वाहनांच्या आगगमनामुळे धूळ उडून पिकांवर बसत आहे. यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया थांबून पिकांची वाढ खुंटत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. तसेच रात्री अपरात्री वाहने धावत असल्याने गावकऱ्यांना त्रास होत आहे. यामुळे या अवैध वाळू वाहतुकीला चाप लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

फोटो कॅप्शन : गोदावरी पात्रातून केणीच्या साहाय्याने काढलेली वाळू.

Web Title: Illegal sand extraction started from Godavari basin in broad daylight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.