अवैध वाळू उपसा; सहा जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: January 5, 2016 00:12 IST2016-01-04T23:35:07+5:302016-01-05T00:12:40+5:30
लातूर : लातूर तालुक्यातील साईलगतच्या मांजरा नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा केल्याप्रकरणी तलाठ्याच्या फिर्यादीवरुन सहा जणांविरोधात

अवैध वाळू उपसा; सहा जणांविरुद्ध गुन्हा
लातूर : लातूर तालुक्यातील साईलगतच्या मांजरा नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा केल्याप्रकरणी तलाठ्याच्या फिर्यादीवरुन सहा जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू उपसा करीत असताना रविवारी ढिगाऱ्याखाली गुदमरुन मरण पावलेल्या एका मजुराचा या गुन्ह्यात समावेश आहे.
लातूर तालुक्यातील साई-महापूर परिसरातील मांजरा नदीपात्राच्या उत्तर काठावर रविवारी दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून बेकायदेशीर वाळू उपसा सुरु होता. या वाळू उपशासाठी चार मजूर काम करित असताना, अचानक वाळूचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली चार मजूर अडकले. उपस्थित नागरिकांनी तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ५५ वर्षीय मजुराचा ढिगाऱ्याखाली गुदमरल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी रविवारी सायंकाळी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या अवैध वाळू उपसाप्रकरणी महापूर सज्जाचे तलाठी धनराज रामेश्वर भोसले (५३) यांनी सोमवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन शिवाजी दगडू जोगदंड (५५), संतोष हरिश्चंद्र जोगदंड, महादू अंतराम सूर्यवंशी, लक्ष्मण कोंडिराम जोगदंड, देविदासराव पवार, महादेव दत्तात्रय वलसे (सर्व रा. आरजखेडा ता. रेणापूर) यांच्याविरुध्द कलम ३७९, ५११ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)