शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध बांधकाम; शंभर जणांवर गुन्हे दाखल होणार

By admin | Updated: August 18, 2015 00:51 IST

जालना : शहरातील विविध प्रभागांत अवैध बांधकाम करणाऱ्या तब्बल शंभर जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित स्वच्छता निरीक्षकांना दिले आहेत.

जालना : शहरातील विविध प्रभागांत अवैध बांधकाम करणाऱ्या तब्बल शंभर जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित स्वच्छता निरीक्षकांना दिले आहेत. शहरात काही वर्षांपासून अवैध बांधकाम करण्याचा धडाका सुरु आहे. काही नागरिकांनी बांधकामाचे सर्व नियम ढाब्यावर बसवून बांधकाम केलेले आहे. शहरातील जुना तसेच नवीन जालना भागात पालिकेच्या जागांवर अनेकांनी बिनदिक्कत मोठे बांधकाम केलेले आहे. पालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करुनही उपयोग झालेला नाही. काही नागरिक नगर पालिकेलाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. शहरात छोटे मोठे मिळून शंभर पेक्षा अधिक लोकांनी अवैध बांधकाम केले आहे.नगर पालिका एफएसआयने काम करा असे सांगत असले तरी नगर पालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी पळवाटा शोधून मदत करीत असल्याचा आरोपही होत आहे.अवैध बांधकामात प्रामुख्याने नगर पालिकेच्या जागेवर बांधकाम, आखून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जागेवर बांधकाम करणे, मजल्यांची मर्यादा न पाळणे आदींचा समावेश आहे. याविषयी पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, गत दोन वर्षांपूर्वी अवैध बांधकाम करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर अद्यापही कारवाई करण्यात आली नव्हती. आता नव्याने सर्व्हे करण्याच्या सूचना निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.ज्या शंभर मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश देण्यात आल्याचे पुजारी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)