शहरात अवैध बांधकामे राजरोस
By Admin | Updated: May 12, 2014 00:08 IST2014-05-11T23:21:12+5:302014-05-12T00:08:46+5:30
बीड : बांधकाम करताना नगर परिषदेकडून रीतसर परवाना घ्यावा लागतो. परंतु बीड शहरात असे परवाने काढणार्यांचे प्रमाण बोटावर मोजण्याएवढेच असल्याचे समोर आले आहे.

शहरात अवैध बांधकामे राजरोस
बीड : बांधकाम करताना नगर परिषदेकडून रीतसर परवाना घ्यावा लागतो. परंतु बीड शहरात असे परवाने काढणार्यांचे प्रमाण बोटावर मोजण्याएवढेच असल्याचे समोर आले आहे. तीन महिन्यात केवळ १९५ परवाने नगर रचना विभागामार्फत दिले आहेत. यावरून विना परवाना बांधकाम करणार्यांकडे नगर परिषदेचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम केले जात आहेत. बांधकाम करताना नगर परिषदेकडून परवाना घेणे अवश्यक असतानाही कोणीही बांधकाम परवाने घेण्यास पुढे येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे जानेवारी ते मार्च २०१४ या तीन महिन्याच्या कालावधीत केवळ १९५ लोकांनीच बांधकाम परवाने घेतले आहेत. प्रत्यक्षात मात्र बीड शहरात हजारावर बांधकामे केली जात असल्याचे दिसून येत आहेत. बांधकाम परवाने देताना आम्ही संपुर्ण काळजी घेत असल्याचे नगर रचनाकार जैन यांनी सांगितले तर मुख्याधिकारी व्ही.बी. निलावाड म्हणाले, किती बांधकामे चालू आहेत व किती लोकांना परवाने दिले आहेत याची चौकशी करण्यात येईल. नगर रचनाकार विभागाला गांभीर्य नाही बांधकाम परवान्या नगर परिषदेतील नगर रचनाकार विभागात विचारणा केली असता त्यांना या बांधकाम परवान्यासंदर्भात कुठलेही गांभीर्य असल्याचे दिसून आले नाही. बांधकाम परवाने घेणार्यांपेक्षा बांधकाम परवाने देणार्यांनाच याचे गांभीर्य नसल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून होत आहे. हजारावर बांधकामे चालू असतानाही तीन महिन्यात केवळ १९५ परवान्यांची नोंद कशी काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. बांधकाम परवाने घेण्यास येत नाहीत की बांधकाम परवाने देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी) कर्मचारी लागले बेरीज-वजाबाकी करायला कोणत्या महिन्यात किती बांधकामे झाले, याचे व्यवस्थीत रेकॉर्डही संबंधीत विभागातील कर्मचार्यांना सांगता आले नाही. कोणत्या महिन्यात किती बांधकाम परवाने देण्यात आले, याची विचारणा केली असता हे कर्मचारी बेरीज-वजाबाकी करण्यातच बेजार झाल्याचे दिसून आले.