शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटी तपासणार औरंगाबादमधील ३१७ कोटींच्या रस्ते कामांची गुणवत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 20:02 IST

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून १०८ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

औरंगाबाद : स्मार्ट सिटीमार्फत लवकरच १०८ रस्त्यांची कामे एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहेत. या कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष ठेवण्यासाठी आयआयटी (पवई) या संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यांचे काम गुणवत्तापूर्ण होईल, असा विश्वास स्मार्ट सिटी प्रशासनाने व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे रस्त्याची कामे स्मार्ट सिटी प्रथमच करीत आहे.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून १०८ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यातील बहुतेक रस्त्यांची कामे काँक्रीटीकरण पद्धतीची राहणार आहेत. ही कामे शासनाच्या निधीतून व्हावीत, या उद्देशाने महापालिकेने ३१७ कोटींचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करून शासनाला पाठविला होता. मात्र, शासनाने मंजुरी दिली नाही. शेवटी ऐन वेळी रस्त्यांची कामे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला. मंडळाने मंजुरी दिल्यावर निविदा काढण्यात आली. रस्त्यांसाठी तीन स्वतंत्र निविदा काढल्या आहेत. तीन कंत्राटदार एकाच वेळी कामे सुरू करणार आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला फक्त नऊ महिन्यांची वेळ देण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ११ निविदा प्राप्त झाल्या.

शिखर संस्थेला प्राधान्यरस्त्यांच्या गुणवत्तेसाठी ‘त्रयस्थ तपासणी’ (थर्ड पार्टी इन्स्पेक्शन) कोणती एजन्सी करणार, याबद्दल स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी सांगितले की, थर्ड पार्टीसाठी आयआयटी (पवई) या शिखर संस्थेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याच संस्थेने ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ करावे, असा आग्रह ‘स्मार्ट सिटी’ ने धरला आहे. त्यांनी अद्याप होकार दिलेला नाही.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयऔरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातूनदेखील ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ करून घेण्याची ‘स्मार्ट सिटी’ची तयारी आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून अन्य कामांचे ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ केले जात आहे. त्यामुळे ही तपासणी आयआयटीनेच करावी, अशी ‘स्मार्ट सिटी’ची भूमिका आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

निविदा रक्कम, प्राप्त निविदापॅकेज - रक्कम - दाखल निविदा१ - ८४ कोटी - ०३२ - ८६ कोटी - ०४३ - ९० कोटी - ०४

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाIIT Mumbaiआयआयटी मुंबई