शासनाच्या आयआयटी पथकाने केली कार्ला, कुमठ्याची पाहणी
By Admin | Updated: July 3, 2014 00:17 IST2014-07-02T23:44:04+5:302014-07-03T00:17:50+5:30
किल्लारी : औसा तालुक्यातील कार्ला व कुमठा या गावांना राज्य शासनाच्या आयआयटी पथकाने रविवारी भेट देऊन गावातील घरांची पाहणी केली़

शासनाच्या आयआयटी पथकाने केली कार्ला, कुमठ्याची पाहणी
किल्लारी : औसा तालुक्यातील कार्ला व कुमठा या गावांना राज्य शासनाच्या आयआयटी पथकाने रविवारी भेट देऊन गावातील घरांची पाहणी केली़ तसेच गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या़
औसा तालुक्यातील कार्ला व कुमठा या गावासाठी राज्य शासनाने २९ कोटी रूपये मंजूर केले आहेत़ या गावांचे पुनर्वसन कोणत्या पद्धतीने करायचे जमिनीची स्थिती, १९९३ च्या भूकंपात पडलेली घरे व त्यानंतर शासनाच्या मदतीवर बांधण्यात आलेली घरेही २००६ च्या भूकंपाने दुभंगली गेली़ याठिकाणी कशाप्रकारची घरे बांधली पाहिजेत, तडे गेलेल्या घरांची दुरुस्ती कोणत्या पद्धतीने करावी, याची पाहणी राज्य शासनाच्या आयआयटी पथकाने केली़ या पथकात वरिष्ठ अभियंता महेंद्र मिना, रोहन सिंदे होते़ तसेच लातूर भूकंप पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता शिवहार लामतुरे़ तसेच मंडळाधिकारी टी़जे़ यादव, मंडळाधिकारी जी़आरख़ुर्दे, तलाठी गरगटे, भुजबळ उपस्थित होते़
कार्यकारी अभियंता लामतुरे म्हणाले, कार्ला व कुमठा गावच्या पुनर्वसनासाठी २९ कोटी रूपये मंजूर झाले आहेत़ यात ७३३ घरे बांधण्यात येणार असून, यात दोन खोल्या व शौचालय असणार आहे़(वार्ताहर)
यावेळी माजी सरपंच विश्वास काळे, दिनकर काळे, राजू पारूडकर, बाबासाहेब पाटील, पद्माकर घोडके, सुरेश पवार, विलास काळे, कुमठ्याचे सरपंच व्यंकटराव पाटील, चेअरमन सोपानराव पाटील, बालाजी रेड्डी, प्रदीप कोठाळे, शिवाजी भोसले, जिल्हा परिषद सदस्य पांडूरंग चेवले, विजयकुमार सोनवणे, गुंडाप्पा बिराजदार, प्रकाश मिरगे, काकडे उपस्थित होते़