शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

कापूस, ऊस, सोयाबीनमुळे तुरीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 12, 2014 00:54 IST

गंगामसला : नगदी पिके घेऊन आर्थिक व्यवहार जलदगतीने करण्यास शेतकरी आता पुढे येऊ लागला आहे. पूर्वी तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते.

गंगामसला : नगदी पिके घेऊन आर्थिक व्यवहार जलदगतीने करण्यास शेतकरी आता पुढे येऊ लागला आहे. पूर्वी तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. मात्र आता सोयाबीन, कापूस, ऊस या नगदी पिकांमुळे तुरीचा पेरा घटला आहे.गत चार ते पाच वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. अगोदरच संकटात सापडलेला शेतकरी आता दुष्काळाला तोंड देऊ लागला आहे. पिके हातून गेल्याने आर्थिक व्यवहारही ठप्प झाले आहेत. माजलगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी नगदी पिके घेऊन आर्थिक व्यवहार गतीमान केल्याचे चित्र दिसून येत आहे.यावर्षी माजलगाव तालुक्यातील गंगामसला परिसरातील एकूण ४ हजार १२६ हेक्टर क्षेत्रापैकी ८८६ हेक्टर एवढा पेरा कमी झाला आहे. या पेऱ्याचे कमी होण्याचे कारण केवळ दुष्काळजन्य परिस्थिती आणि तुरीवर होणारे विविध रोग हेच असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.तुरीचे पीक हे पारंपरिक पीक म्हणून घेतले जाते. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे तुरीचा पेरा केला जायचा. मात्र आता तुरीऐवजी सोयाबीन, कापूस ही नगदी पिके घेण्यात शेतकरी व्यस्त झाला आहे. कापसाच्या माध्यमातून जास्त पैसा मिळत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. तुरीवर कीड पडल्यानंतर मोठा तोटा सहन करावा लागतो. सर्वसामान्य शेतकऱ्याला हा तोटा सहन होणारा नसतो, त्यामुळे कमी शेती असणारे शेतकरीही आता नगदी पिके घेण्यास पसंती देऊ लागले आहेत. आहे त्या पिकांना भाव देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)