शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

‘करोगे याद, तो हर बात याद आयेगी...'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:16 PM

औरंगाबादचे भूषण, शायर बशर नवाज यांचा आज चौथा स्मृतिदिन.यानिमित्त कविवर्य प्रा. फ. मुं. शिंदे  यांनी त्यांच्या जागविलेल्या आठवणी. 

बशर नवाज हे आमचे परम मित्र होते. माणूस म्हणूनही ते अतिशय सद्गुणी होते. जुन्या- नव्या कवींवर प्रेम करणं, त्यांच्याकडूनच शिकायला पाहिजे. खरं तर देशभर कीर्ती कमावलेला हा मराठवाड्यातला माणूस आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होय. सामाजिक धारणेच्या आणि त्याबरोबरच उत्कट प्रेमाच्याही नितांत सुंदर कविता बशर नवाज यांनी लिहिल्या. हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली मोजकीच; परंतु महत्त्वपूर्ण अशी गाणीही कवितेच्या अंगानंच लिहिली.‘बाजार’ मधील त्यांची रचना, ‘करोगे याद, तो हर बात याद आयेगी, गुजरते वक्त की हर मौज ठहर जायेगी’ अशा रचनांमधून त्यांनी पायाभूत अशा काही गोष्टी मांडून ठेवल्या. 

बशर नवाज यांना कधीही प्रसिद्धीचा सोस नव्हता. स्वत:चं मोठेपण विसरून ते अवती-भवतीच्या सामान्य मित्रांमध्ये एकरूप होत. असा उर्दूचा शायर आणि भारताचा कवी आज राहिला नाही, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. याचं कारण असं की, हा कवी त्याच्या काव्यातून अजरामर झालेला आहे. अतिशय सोप्या उर्दूतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सार्वजनिक कार्यक्रम किंवा मित्रांची एखादी खाजगी मैफल असो ते सारखेच रंगून जायचे. हिंदीमधले महान लेखक व दिग्दर्शक सागर सरहद्दी यांच्यासाठी बशर नवाज यांनी गीतलेखनाचं काम केलं. पण त्यांनी औरंगाबाद शहर हे कधीही सोडलं नाही. इथं बसूनच ते जगाशी संवाद करीत असत. म्हणून आज ते आहेत, नाहीत, हा प्रश्नच उद्भवत नाही. ते सगळ्यांच्या अंत:करणात आहेतच. मी त्यांची आठवण करतो.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्यcinemaसिनेमा