भगवंताच्या दृष्टीने पहायला शिकल्यास प्रश्न सुटतील
By Admin | Updated: January 15, 2015 00:06 IST2015-01-14T23:40:37+5:302015-01-15T00:06:12+5:30
जालना : आपण आपल्या दृष्टीने जे काही पाहतो. त्यातून स्रेहभाव कधीही जागा झालेला दिसेलच असे नाही. दृष्टीदोषामुळे अनेक विघ्ने आलेली आहे.

भगवंताच्या दृष्टीने पहायला शिकल्यास प्रश्न सुटतील
जालना : आपण आपल्या दृष्टीने जे काही पाहतो. त्यातून स्रेहभाव कधीही जागा झालेला दिसेलच असे नाही. दृष्टीदोषामुळे अनेक विघ्ने आलेली आहे. मात्र भगवंताच्या दृष्टीने पाहायला शिका आणि मग पहा काय चमत्कार होतोय. भगवंताची दृष्टी ही स्रेहभाव निर्माण करणारी असून आपणही आपला दृष्टीदोष घालवून भगवंताच्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असा हितोपदेश प. पू. विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी मसा. यांनी आज (ता.१४) येथे बोलतांना केला.
परिवर्तन प्रवचनमाला आणि अजंनशलाका महोत्सवानिमित्त मंठा चौफुली जवळील कुबेर इस्टीट प्रिन्स मधील वाराणसीनगरीमध्ये आयोजित प्रवचन मालेत ते बोलत होते. आज बुधवारी महाराजांनी आपल्या प्रवचनातून अंजनशलाका महोत्सवाचे महत्व विषद करुन सांगतांनाच दृष्टी, ऱ्हदय आणि पाय या त्रिसुत्रीवर प्रवचनातून श्रोत्यंचे प्रबोधन केले. आज सकाळी प्रवचनादरम्यानच भगवंत परमात्म्याच्या जन्मोत्सवाचे दर्शन श्रोत्यांना झाले. अत्यंत उत्साही वातावरणात हा सोहळा पार पडला. त्यावेळी श्रोत्यांनी भावगिताच्या तालावर नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला.
पुढे बोलतांना प. पू. विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी मसा.म्हणाले की, दृष्टी ही मोठी किंमती आहे. भगवंताने आपल्याला दृष्टी दिली असली आपण दिलेल्या या दृष्टीचा उपयोग कसा करतो? जी दृष्टी भगवंताचे रुपही पाहू शकत नाही, अशी दृष्टी काम कामाची. दुर्योधनाच्या दृष्टीने पाहिल्यास गर्ग आणि त्यातूनच विनाश हा अटळ असतो. असे असतांनाही आम्ही आमची दृष्टी नको तिकडे वळवली आहे.
जशी दृष्टीही भगवंताचरणी लिन झालेली पाहिजे तसेच ऱ्हदयही भगवंताला अर्पण केलेलेच पाहिजे. राम हनुमानाच्या ऱ्हदयस्थानी होते. श्रीकृष्ण सुदामाच्या ऱ्हदयस्थानी होते. तर महावीरांच्या ऱ्हदयस्थानी गौतम होते. भगवंताची अशी अनेक उदाहरणे देता येतील मात्र आपल्या ऱ्हदयस्थानी कोण? याचे उत्तर देऊ शकता का? आपली दृष्टीच हीन झालेली असल्याने ऱ्हदयाचा प्रश्नच कुठे? हे भगवंता मला अशी दृष्टी दे जी तुझ्या नजरेने पाहू शकेल आणि ऱ्हदय असे दे की ज्यात तुला सामावून घेता आले पाहिजे. पायात अशी शक्ती दे की जी तुझ्याकडे येण्यासाठी थकले नाही पाहिजेत.
आमच्यासारख्या साधूंकडे पांढऱ्या वस्त्राशिवाय काहीही नाही. मात्र आम्ही जे पाहतो ते भगवंताच्या दृष्टीने पाहतो म्हणूनच समोर कितीही रुपवती स्त्री आली तरी आमचे मन भटकत नाही. उलट ते मन विचार करते ही सुंदरी इतकी रुपवान आहे तर मग भगवान परमात्मा किती रुपवान असतील, ही आमची दृष्टी आहे. स्त्रीमध्ये माता पाहण्याची आमची वृत्ती आहे. म्हणूनच आम्ही कुठेही गेलो तरी शंकेचे कारणच निर्माण होत नाही.
आम्ही कुठे गेलो तरी स्वागतच आहे. तुम्ही परक्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करुन पाहा! तुमच्याकडे शर्टाला कॉलर असली तरी मान नाही. कॉलर नसतांनाही तो आम्हाला मिळत आहे.
गुरुवारी १५ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ८.३० वाजता प्रियंवदादासी व्दारा जन्मोत्सवाची शुभकामना देण्यात येणार असून त्यानंतर नामकरण सोहळा आणि भगवंतांचे पाठशाला गमन आणि लग्न उत्सव पार पडणार आहे. यावेळी मामा- मामीच्यावतीने राज्याभिषेक नवलोयमांतिक देवोंव्दारा प्रभूजीला दीक्षा विनंती करण्यात येणार असून दुपारी १२.३९ वाजता माणिभद्रा पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी सांझी तसेच महेंदी वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.