मिटरला छेडल तर पळतयं अधिक

By Admin | Updated: September 22, 2014 00:55 IST2014-09-22T00:28:35+5:302014-09-22T00:55:28+5:30

राजेश खराडे , बीड महावितरणच्या वतीने शहरात इन्फ्रारेड (आय.आर.) पद्धतीचे मीटर बसविण्यात आली आहेत. या आधुनिक पद्धतीच्या मीटरशी छेडछाड केल्यास ते दुप्पट गतीने पळत

If you hit the mile, then run more | मिटरला छेडल तर पळतयं अधिक

मिटरला छेडल तर पळतयं अधिक


राजेश खराडे , बीड
महावितरणच्या वतीने शहरात इन्फ्रारेड (आय.आर.) पद्धतीचे मीटर बसविण्यात आली आहेत. या आधुनिक पद्धतीच्या मीटरशी छेडछाड केल्यास ते दुप्पट गतीने पळत असल्याने वीज चोरीला ‘बे्रक’ लागण्यास मोठी मदत मिळत आहे. पुढीला काळात वीज चोरी पूर्णत: रोखली जाईल, असा आशावाद या निमित्ताने निर्माण आहे.
वीज चोरी होत असल्याने महावितरणचा कोट्यावधीचा तोटा होत असल्याचे यावेळी अनेकवेळा समोर आले आहे. त्यामुळे महावितरणने जिल्ह्यात आयआर पद्धतीचे मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या सहा ते आठ महिन्यांच्या कालावधीत शहरातील ३६ हजार ग्राहकांपैंकी २८ हजार ग्राहकांना आय.आर मीटर बसिवण्यात आले आहे. पुर्वी इलेक्ट्रानिक पद्धतीचे मीटर बसविण्यात आली होती. त्याच्यासाठी रिमोटचा वापर होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या समोर आल्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन इन्फ्रारेड पद्धतीचे मीटर तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे मीटरची रिडींग ही कागदावर न होता रिमोट कंट्रोल द्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना अचुक वीज बिल मिळत आहे. शहरात सर्वत्र मीटर बसिवण्याची मोहिम सुरू असून अद्यापर्यंत २८ हजार ग्राहकांना हे मीटर बसविण्यात आली आहेत. आयआर मीटर हे रिमोटद्वारे हताळले जात असून मीटरमधील रिडींग ही डायरेक्ट मशीनद्वारे घेतली जात असल्याने अचूक अंकाची नोंद होते. आय.आर मीटरचे वैंशिष्ट म्हणजे मीटरची स्पीड कमी करण्याचा प्रयत्न केल्यास मीटर अधिक गतीने पळते. परिणामी अतिरीक्त रिडींगची नोंद होत असल्याने याचा फटका हा ग्राहकांनाच होतो.
आॅनलाईन तक्रारीचा ग्राहकांना लाभ
गेल्या एक ते दीड वर्षाखाली ग्राहक वीज बिल चुकीचे आले असल्याच्या तक्रारी लेखी स्वरुपात महावितरण कार्यालयात देत असत. तो अर्ज संबंधित अभियंत्याकडे गेल्यानंतर त्याची चौकशी व्हायची. या क्लिष्ट प्रक्रियेत बराच काळ जायचा. मात्र आता आॅनलाईन तक्रारीची सुविधा महावितरणने सुरू केली आहे. ग्राहक चुकीचे वीज बिल आल्यास किंवा इतर तक्रारी असल्यास आॅनलाईन पद्धतीने नोंदू शकत आहेत. त्यामुळे या तक्रारी निकाली काढण्याच्या सूचना संबंधितत अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. तक्रारीची दखल घेतली नाही तर तीच तक्रार वरिष्ठ अभियंते, उपअभियंते व अधीक्षक यांच्याकडे जात आहे. तसेच त्यांनीही दखल घेतली नाही तर थेट महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या वतीने दखल घेण्यात येत आहे. महावितरणच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांच्या तक्रारी निकाली निघत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ग्राहकांची तक्रार संख्या पाच-सहा हजारावरुन अधिक झाली आहे.

Web Title: If you hit the mile, then run more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.