शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शेतकऱ्यांनो, भाव मिळत नाही तर शेतमाल तारण ठेवा अन् कर्ज मिळवा; काय आहे योजना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:13 IST

बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाचे गोदाम भाडे, विमा व इतर अनुषांगिक खर्च बाजार समितीमार्फत करण्यात येते

छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी जिल्ह्यात शेतमाल तारण योजनेला प्रतिसाद वाढण्याची गरज आहे. कृषी पणन मंडळ यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, १९९१पासून सुरू असलेल्या या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांसाठीच्या कृषी पणन मंडळामार्फत ही योजना हाताळली जाते.

काय आहे योजना?मूग, उडीद, सोयाबीन, धान (भात), तूर, सूर्यफूल, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा, हळद, बेदाणा, वाघ्या घेवडा (राजमा), सुपारी, काजूबी या शेतमालाचा तारण कर्ज योजनेत समावेश आहे. यापैकी पहिल्या बारा शेतमालाचे बाजारभाव अथवा किमान आधारभूत किंमत यापैकी कमी दरानुसार होणाऱ्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत तारण कर्ज त्वरित उपलब्ध होते. हळदीच्या प्रचलित बाजारभावाच्या ७५ टक्के इतके शेतमाल तारण कर्ज देण्यात यावे, बेदाण्याची प्रतिक्विंटल ७ हजार ५०० किमान किंमत किंवा प्रचलित बाजारभाव जी कमी असेल, तो दर हा शंभर रुपयांपेक्षा जास्त विचारात घेऊ नये, इ. नियम यात आहेत. बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाचे गोदाम भाडे, विमा व इतर अनुषांगिक खर्च बाजार समितीमार्फत करण्यात येईल. वखार महामंडळाच्या गोदामात शेतमाल ठेवून घेतलेल्या वखार पावतीवरही शेतमाल तारण कर्ज उपलब्ध आहे.

व्याजदर किती?कर्ज घेतल्यापासून १८० दिवसांपर्यंत द. सा. द. शे. ६ टक्के दराने व्याज आकारणी होते. चार वर्षांत ५३४ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

तारण ठेवणारे शेतकरी किती?वर्ष संख्या कर्ज२०२१-२२:२६२२०२२-२३:२६९२०२३-२४:१२२२०२४-२५:३

योजनेचा लाभ घ्यावाशेतमालाला कमी भाव मिळत असल्यास शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेच्या प्रचार - प्रसारासाठी कृषी पणन मंडळ प्रयत्नशील आहे. बसस्टँडवर ‘जिंगल’ वाजवून प्रसिध्दी केली. बाजार समित्यांमध्ये पोस्टर्स पोहोचवले. कृषी प्रदर्शनांमधून प्रचार केला.- जी. सी. वाघ, विभागीय उपसरव्यवस्थापक, कृषी पणन मंडळ, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर