मनपाची सेवा नसेल, तर करही देणार नाही...
By Admin | Updated: April 13, 2015 00:48 IST2015-04-13T00:39:45+5:302015-04-13T00:48:32+5:30
लातूर : एमआयडीसी भागातील उद्योजक लातूर महानगरपालिकेची कोणतीही सेवा घेत नाहीत. त्यामुळे मनपाने उद्योजकांकडून कर घेऊ नये,

मनपाची सेवा नसेल, तर करही देणार नाही...
लातूर : एमआयडीसी भागातील उद्योजक लातूर महानगरपालिकेची कोणतीही सेवा घेत नाहीत. त्यामुळे मनपाने उद्योजकांकडून कर घेऊ नये, असे निवेदन लघुउद्योग भारती संघटनेने खासदार, आमदारांसह मनपा आयुक्तांना दिले आहे.
लातूरच्या एमआयडीसीतील उद्योजक आणि व्यापाऱ्यांची बैठक रविवारी झाली. लातूर शहरातील शिवाजी नगर भागातील इंडस्ट्रीयल इस्टेट या वस्तीमधील उद्योजकांना मनपाद्वारे टार रोड, पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्यासाठी सुमारे १ रुपये स्क्वेअर फुट असा मालमत्ता कर लावण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. लातूरच्या एमआयडीसी भागात मात्र मनपाकडून कोणतीही सेवा घेतली जात नाही. त्यामुळे मालमत्ता कर लावण्याच्या अनुषंगाने एमआयडीसीचा स्वतंत्र झोन तयार करावा. मनपाने गावातील इंडस्ट्रीयल इस्टेटप्रमाणे सेवा देऊन त्याच धर्तीवर मालमत्ता कर आकारावा, असे निवेदन उद्योजकांनी खासदार सुनील गायकवाड, आमदार अमित देशमुख, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांच्याकडे दिले आहे. (प्रतिनिधी)