वीज जाणार असेल तर मिळेल सूचना; मोबाइल नोंदणी केली का?

By साहेबराव हिवराळे | Published: October 19, 2023 07:25 PM2023-10-19T19:25:55+5:302023-10-19T19:26:09+5:30

परिमंडळात १३ लाखांपैकी १२ लाख ग्राहकांचे महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंद

If there is a power outage, you will get a notification; Mobile registered? | वीज जाणार असेल तर मिळेल सूचना; मोबाइल नोंदणी केली का?

वीज जाणार असेल तर मिळेल सूचना; मोबाइल नोंदणी केली का?

छत्रपती संभाजीनगर : वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती ''एसएमएस''द्वारे मिळवण्यासाठी परिमंडलातील ९४ टक्के ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविला आहे. नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदविलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून वीजग्राहकांना या सेवांचा लाभ घेता येऊ शकतो.

आजच्या धावपळीच्या काळात बहुतेक सारे मोबाइल व ऑनलाइनवर विसंबून राहत असल्याने रांगेत थांबण्यापेक्षा क्षणात काम कसे होईल, या सोयीपोटी ग्राहकही या सेवेस प्रतिसाद देत आहेत. छत्रपती संभाजीनगर परिमंडळात १३ लाख १८ हजार ७२ वीजग्राहकांपैकी १२ लाख ४० हजार ७१२ ग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदविलेला आहे.

एसएमएसवर मिळतात सुविधा
या ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख ही माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे.

मोबाइल क्रमांक कसा नोंदवाल?
जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा सर्व वर्गवारीतील ९४ टक्के ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी झालेली आहे. असे असले तरी ज्या ग्राहकांना आपला मोबाइल क्रमांक बदलायचा आहे, अशा ग्राहकांनी तसेच ज्यांना नव्याने क्रमांक नोंदवायचा, असे ग्राहक २४ तास सुरू असणाऱ्या १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ व १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर मोबाइल क्रमांक व तक्रारही नोंदवू शकतात.

२४ तास सेवा
महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा २४ तास सुरू असलेल्या महावितरण ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे. अनेकजण या सेवेचा लाभ घेत आहेत.
- महावितरण अधिकारी

Web Title: If there is a power outage, you will get a notification; Mobile registered?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.