शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या रिक्तपदाची जाहिरात न दिल्यास मुख्याध्यापक, प्राचार्य राहणार जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 14:25 IST

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस

छत्रपती संभाजीनगर : पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षणसेवक, शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी २० जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक संस्थाचालकांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यास अनुत्सुकता दाखविली. त्यामुळे नोंदणीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत रिक्त पदे असून, पोर्टलवर नोंदणी न करणाऱ्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य रिक्त पदांसाठी जबाबदार राहतील, असा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी अल्पसंख्याक वगळून सर्व व्यवस्थापनांना दिला आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे. खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना रिक्त पदांसाठी बिंदूनामावली प्रमाणित करून पवित्र पोर्टलवर नोंदणी करायची आहे. त्यानुसार २० जानेवारीपासून सुरुवात झाली होती. महिनाभर मुदत दिल्यानंतरही अनेक संस्थांनी नोंदणीच केली नसल्याचे उघडकीस आले आहे. संस्थेची बिंदुनामावली अद्ययावत नसल्यास शिक्षक नियुक्तीबाबतची कार्यवाही करता येणार नाही. त्यामुळे बिंदुनामावलीअभावी पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीपासून वंचित राहिल्यास त्यास संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन जबाबदार राहणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अल्पसंख्याकवगळून इतर खासगी व्यवस्थापनांनी तत्काळ पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मुकुंद यांनी केले आहे.

एवढ्या संख्येची नोंदणीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४ संस्थांनी नोंदणी केली आहे. या संस्थांमध्ये शिक्षकांच्या २७३ जागा भरण्यात येणार आहेत. त्यात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील १६६, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतील ३८ जागांचाही समावेश आहे. त्याशिवाय इतर चार जिल्ह्यांतही संस्थांमधील रिक्त जागांची आकडेवारी समोर येत आहे.

प्रक्रियेत सहभागी व्हावेअनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षण सेवक, शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करून प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे.- प्रकाश मुकुंद, उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर विभाग

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTeacherशिक्षकEducationशिक्षण