मूर्तीकारांची रात्रशाळा
By Admin | Updated: August 18, 2014 01:01 IST2014-08-18T00:38:22+5:302014-08-18T01:01:06+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर गणपती बाप्पांच्या स्थापनेचा कालावधी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही दुष्काळसदृश परिस्थितीत मूर्तीच्या बुकिंगमध्ये यावर्षी वाढ झाली नाही़़ प

मूर्तीकारांची रात्रशाळा
बाळासाहेब जाधव , लातूर
गणपती बाप्पांच्या स्थापनेचा कालावधी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही दुष्काळसदृश परिस्थितीत मूर्तीच्या बुकिंगमध्ये यावर्षी वाढ झाली नाही़़ परंतु, गणेशमूर्तीच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालांच्या किंमतीत २० ते २६ टक्क्यांची वाढ झाली आहे़ काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या उत्सवासाठी गणेशमूर्तीवर रंगरंगोटीचे काम रात्रं-दिवस सुरू आहे. यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मागणीत फारशी वाढ नसली, तरी काम मात्र प्रगतीपथावर सुरू असल्याचे मूर्तीकार उमेश सोनवळकर यांनी सांगितले.
वडिलोपार्जित व्यवसाय मूर्ती बनविण्याचा असल्याने त्यांच्या पावलावर पाऊल टाकत गेल्या ३२ वर्षांपासून उमेश सोनवळकर हे गणेशमूर्ती निर्मितीचा व्यवसाय करीत आहेत़ जुलै महिन्यात त्यांनी राजस्थान येथून २५ टन जिप्सम पावडर व तामिळनाडू जवळील सेलम येथून ४५ किलो केसर डाय रबर बनविण्यासाठी २५० लिटर डाय मॉडेल मागविले आहे.
या कच्च्या साहित्याच्या आधारे मूर्ती बनविण्याचे काम प्रगतीपथावर सुरू केले़ यामध्ये त्यांनी २ फुटांच्या १५० गणेशमूर्ती, ३ फुटांच्या १५० मूर्ती तर ६ ते १० फुटांच्या ५० गणेशमूर्तीची निर्मिती केली़ परंतु, पावसाअभावी गणेश स्थापनेचा कालावधी १२ दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही ग्राहकांची मात्र वर्दळ कमीच आहे. त्यामुळे गणेशमूर्तीच्या व्यवसायास यावर्षी फटका बसतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़
गणेशमूर्ती निर्मिती करणाऱ्या मूर्तीकरांना हा व्यवसाय करण्यासाठी सहा महिन्यांपासूनच भांडवलाची गुंतवणूक करावी लागते़ परंतु, कच्च्या मालाच्या किंमतीत यावर्षी वाढ झाल्यामुळे व्यवसाय अडचणीत येतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़
मूर्तीकार उमेश सोनवळकर यांनी मूर्ती निर्मितीच्या व्यवसायात रावसाहेब कांबळे, शिवाजी होडगिरे, बालाजी धावर, मंगेश तोडकर, बाबासाहेब कांबळे, नामदेव वहाळे या सहा तरूणांना तयार केले असून, त्यांनी केलेल्या मूर्ती निर्मितीतून २० जणांचा उदरनिर्वाह चालविला जात आहे़ परंतु, यावर्षी गणपती उत्सव बारा दिवसांवर येऊन ठेपला तरी ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याने मूर्तीकारात नाराजी दिसून येत आहे़
डाय मॉडेलप्रमाणे नवीन डिझाईन लातुरात आल्या आहेत़ त्यामुळे मुंबई, पुणे येथे तयार करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या मोठ-मोठ्या गणेशमूर्ती आता लातुरात तयार केल्या जात आहेत. चिंचपोंगळी राजा व पेशवा गणपतीच्या आगळ्यावेगळ्या मूर्ती तयार करण्यात आल्या असून, यावर्षीच्या उत्सवात सदरील गणेशमूर्ती आकर्षण ठरणार आहेत़