शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर मनपाने लावली आयडिया; रोबोटने शोधले ५४ अनधिकृत नळ कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:17 IST

सिल्क मिल कॉलनी भागात मनपाच्या १५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर अनधिकृत नळ सापडले.

छत्रपती संभाजीनगर : शहरात अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या लाखोंच्या घरात आहे. ज्यांनी अधिकृत नळ घेतले त्यातील ८० टक्के नागरिक पाणीपट्टीही भरत नाहीत. त्यामुळे महापालिकेने बुधवारी अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची माेहीम सुरू केली. शुक्रवारी सिल्क मिल कॉलनी भागात एकाच जलवाहिनीवरील तब्बल ५४ नळ शोधून काढले. सर्व कनेक्शन खंडित करून प्रत्येक नागरिकाकडून ५ हजार रुपयांप्रमाणे २ लाख १३ हजार दंड वसूल केला.

महापालिकेच्या रेकॉर्डवर ३ लाखांहून अधिक मालमत्तांची नोंद आहे. यातील किमान ८० टक्के मालमत्ताधारकांकडे एक किंवा दोन नळ कनेक्शन असावेत असा मनपाचा अंदाज आहे. मनपाच्या रेकॉर्डवर फक्त १ लाख २५ हजार नळ कनेक्शनची नोंद आहे. उन्हाळ्यात सर्वाधिक ओरड अनधिकृत नळ कनेक्शनधारकांकडून होते. पूर्वी पाणीपट्टी ४ हजार ५० रुपये होती. आता ती २ हजार २५ रुपये केली, तरी नागरिक पाणीपट्टी भरत नाहीत. १८ ते २२ कोटी रुपये पाणीपट्टीतून वसूल होतात. दरवर्षीद पाणीपुरठ्यात ७५ ते ८० कोटींची तूट मनपा सहन करते.

रोबोटचा वापर सुरूरेल्वे स्टेशन भागातील शाहशोख्तामियाँ दर्गा, सिल्क मिल कॉलनी येथे जुन्या १५० मिमी जलवाहिनीवर पाणीपुरवठा होत नसल्याने काही चोकअप असल्याची शंका होती. रोबोट तंत्रज्ञान वापरून शोध घेतल्यावर जलवाहिनीवर चुकीच्या पद्धतीने आणि अनधिकृत नळ कनेक्शनचे मोठे जाळे असल्याचे लक्षात आले. ५४ नळ कनेक्शन खंडित केले. प्रत्येकी पाच हजार दंड ठोठावला. २ लाख १३ हजार ३५० रुपये नागरिकांकडून वसूल करण्यात आले. ही कारवाई कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांच्या नेतृत्वाखाली उपअभियंता महेश चौधरी, पथक अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता अमित पंडागळे, लाइनमन शेख कासीम, ईसा खान, पथक कर्मचारी तमीज पठाण, वैभव भटकर, तुषार पोटपिल्लेवार, स्वप्निल पाईकडे आणि सागर डिघोळे यांनी केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका