आयसीएफची राजगड किल्ला मोहीम फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:23 AM2019-02-03T00:23:15+5:302019-02-03T00:23:32+5:30

इंडियन कॅडेट फोर्स व जिल्हा अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजगड किल्ला या गिरीभ्रमण मोहीम औरंगाबादच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी यशस्वीपणे फत्ते केली. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजावणे येथून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली

The ICF's Rajgad Fort Campaign | आयसीएफची राजगड किल्ला मोहीम फत्ते

आयसीएफची राजगड किल्ला मोहीम फत्ते

googlenewsNext

औरंगाबाद : इंडियन कॅडेट फोर्स व जिल्हा अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजगड किल्ला या गिरीभ्रमण मोहीम औरंगाबादच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी यशस्वीपणे फत्ते केली.
राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजावणे येथून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सहभागी चाळीस गिर्यारोहकांनी समुद्रसपाटीपासून ४६०० फूट उंचीवरील राजगड किल्ला मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. या मोहिमेदरम्यान गिरीप्रेमींनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा, तोरणा, सिंहगड व जवळपास असणाऱ्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेतला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आयसीएफचे कमांडर विनोद नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर नावकर, नीलम नरवडे, राहुल अहिरे, सागर बच्छिरे, रत्नदीप देशपांडे, चेतन सरोदे, सूरज सुलाने, शोएब पठाण आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: The ICF's Rajgad Fort Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.