..तर राजकारणातून संन्यास घेईन - धस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:22 IST2017-10-20T00:22:58+5:302017-10-20T00:22:58+5:30

माझ्या आमदारकीच्या काळात एखाद्या कार्यकर्त्याकडून आमदार फंड देण्यासाठी मी टक्केवारी घेतलेली दाखवून दिले तर राजकारणातून संन्यास घेईन असे आव्हान माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी देत राजकीय फटाकेबाजी केली.

I will retire from politics- Dhas | ..तर राजकारणातून संन्यास घेईन - धस

..तर राजकारणातून संन्यास घेईन - धस

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : माझ्या आमदारकीच्या काळात एखाद्या कार्यकर्त्याकडून आमदार फंड देण्यासाठी मी टक्केवारी घेतलेली दाखवून दिले तर राजकारणातून संन्यास घेईन असे आव्हान माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी देत राजकीय फटाकेबाजी केली.
दोन दिवसापूर्वी आ. भिमराव धोंडे यांनी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य सत्कार समारंभात या आधीच्या आमदारांनी त्यांचा आमदार विकास निधी वाटप करताना कार्यकर्त्यांकडून टक्केवारी घेतल्याचा आरोप जाहीर सभेत केला होता. त्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी पत्रकार परिषद गुरुवारी आयोजित केली होती.
धस म्हणाले, मी माझ्या १५ वर्षाच्या कारकीर्दित माझ्या आमदारकीच्या फंड वाटपात मी टक्केवारी घेतली असा एखादा कार्यकर्ता आमदार धोंडे यांनी दाखवावा. तसे दाखविल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ असे आव्हान सुरेश धस यांनी यांनी दिले.
आ. भिमराव धोंडे यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसून ते बिनबुडाचे आरोप करतात, असेही धस म्हणाले.

Web Title: I will retire from politics- Dhas