मैं अकेलाही चला था...लोग मिलते गये और कारवाँ बनता गया
By Admin | Updated: January 6, 2017 00:29 IST2017-01-06T00:27:46+5:302017-01-06T00:29:59+5:30
जालना : ‘मै अकेला ही चला था जनीबे मंजील- मगर लोग मिलते गये और कारवॉं बनता गया’ या प्रमाणे जालन्यातील मुशायरा व हिंदी व मराठी कवितांची परंपरा रौप्य महोत्सवात पोहचली.

मैं अकेलाही चला था...लोग मिलते गये और कारवाँ बनता गया
जालना : ‘मै अकेला ही चला था जनीबे मंजील- मगर लोग मिलते गये और कारवॉं बनता गया’ या प्रमाणे जालन्यातील मुशायरा व हिंदी व मराठी कवितांची परंपरा रौप्य महोत्सवात पोहचली.
जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्यासाठी येथील बज्म शमा-ए-अदब या संस्थेकडून गत २५ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे मुशायरे व कवी संमेलनाचे आयोजन करून जनजागृती करण्याचे काम होत आहे. येथील सेवानिवृत्त अभियंता एम.एच. खान दुर्राणी हे जालना शहरातील उर्दू, हिंदी, मराठीचे नामांकित मान्यवर कवी, शायर यांच्या सहकार्याने जातीय सलोखा, प्रेम, आदर, सद्भावना व राष्ट्रीय एकात्मता अखंडता व भारतीय भाषांना उत्तजेन तसेच प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवितात. मुशायरा व हिंदी कवितांची जालनेकरांना मेजवाणी मिळावी म्हणून १० जानेवारी १९९२ रोजी बज्म शमा-ए-अदम, हिंदू मुस्लिम कौमी एकता राष्ट्रीय अखंडता- सदभावना सेवाभावी संस्थेची स्थापना केली. त्यानंतर सुरू झाले दर्जेदार व श्रवणीय अशा मुशायरा व कवितांचे कार्यक्रम. या कार्यक्रमांना जालनेकरांनी डोक्यावर घेतले. २५ वर्षांत तब्बल ३०० मुशायरे झाल्याचे दुर्राणी यांनी सांगितले. यात विविध जाती-धर्माचे लोक आनंदाने सहभागी होऊन आपले कविता, मुशायरे सादर करतात. त्रैभाषिक मुशायरे, कवी संमेलने, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, १ मे, दीपावली, ईद, ख्रिसमसनिमित्त मुशायराचे आयोजन करण्यात येते.
मुशायरा व कवी संमेलनाची आठवण सांगताना दुर्राणी म्हणाले, ‘मै अकेला ही चलाथा जनीले मंजील- मगर लोग मिलते गये और काफिला बनता गया’ या प्रमाणे शेकडो मुशायरा व कविता सादर करण्यासाठी माझ्यासोबत जोडल्या गेले. जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता नांदावी म्हणून दुर्राणी यांनी ईद व त्यौहार की खुशीयाँ आओ मनाए हम मिलकर, कौमी एक जहेती और इन्सानियत की शान बढाये हम मिलकर, भारत देश नाम हुआ उँचा सारे देश मे जीस से हफिज, प्रेम अहिंसा की हरसू वो शमा जलाये हम मिलकर यासारख्या मुशायरातून जातीय सलोखा जपला.