शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

सत्तेच्या अहंकारात ऐवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधीच पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 12:59 IST

Devendra fadanvis: सरकारच्या संवेदना हरवल्या,जनता त्यांना कधीच माफ करणार नाही

औरंगाबाद : विरोधी पक्ष म्हणून सरकारला सहकार्य केलं, तरी देखील सरकार दोन पावले पुढे येण्यास तयार नाही. काल एका एसटी कर्मचाऱ्याचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे सरकार चर्चा करायची सोडून मेस्मा लावण्याची भाषा करत आहे. मला वाटत या सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत, असे सत्तेच्या अहंकारात मदमस्त राज्यकर्ते कधी पाहिले नव्हते, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanavis) यांनी आज केली. ते संघटनात्मक कार्यक्रमासाठी शहरात आले आहेत. 

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, काल तर मला माहिती मिळाली की एक उपोषण करता कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. हा सरकारचा असंवेदनशीलतेचा कळस आहे. मेस्मा लावायच्या ऐवजी सरकारने चर्चेतून मार्ग काढावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला सहकार्य केले, मात्र सरकार दोन पावले पुढे येण्यास तयार नाही. मला असं वाटतं की सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत.

सत्तेच्या अहंकारात राज्यकर्ते मदमस्त नायर हॉस्पिटलमध्ये आग लागली तेव्हा सरकारच्यावतीने कोणी बघायला देखील गेले नाही. आमच्या नगरसेवकांनी आमदारांनी विषय मांडला. त्यानंतर राज्यकर्त्यांना जाग आली आणि त्यानंतर हे बघायला गेले. सत्तेच्या अहंकारामुळे एवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधी पाहिले नाहीत,जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, अशी टीकाही यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली. 

'सामना'चा केंद्रबिंदू गांधी परिवार मी पहिल्यांदाच सांगितलं की सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदललेले आहेत. त्यांचे नेते अलीकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी झाले आहेत. म्हणून मला असं वाटतं की तीच प्रचीती  आता आपल्याला मिळत आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादBJPभाजपा