मी लोकसभेचा माणूस, शिर्डीतून संधी मिळाल्यास पुन्हा लढेल: रामदास आठवले
By शांतीलाल गायकवाड | Updated: September 16, 2022 16:14 IST2022-09-16T16:14:06+5:302022-09-16T16:14:49+5:30
भाजप, रिपाइं सोबत आता शिंदे यांची खरी शिवसेनासोबत आहे.

मी लोकसभेचा माणूस, शिर्डीतून संधी मिळाल्यास पुन्हा लढेल: रामदास आठवले
औरंगाबाद: मी लोकसभेचा माणूस आहे. शिर्डी मतदार संघातून संधी मिळाल्यास मी पुन्हा लढेल व विजयी होईल, अशी ईच्छा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
औरंगाबाद जिल्हात अत्याचार झालेल्या दोन दलित व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट व माजी राज्यमंत्री अॅड. प्रितमकुमार शेगावकर यांचे चिरंजीव प्रशांत शेगावकर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आठवले आज शहरात आले आहेत.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता संपविणे हे आमचे लक्ष्य असून त्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. कारण भाजप, रिपाइं सोबत आता शिंदे यांची खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. सतत भूमिका बदलणारे मनसेचे राज ठाकरे यांची आम्हाला गरज नाही. त्यांनी आमच्या कडे येऊ नये, असेही ते म्हणाले.