शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद गॅझेटचा प्रभाव! मराठवाड्यात दोन महिन्यांत १७ हजार ९४६ नवीन कुणबी दाखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:24 IST

मराठवाड्यात आतापर्यंत एकूण २ लाख ५६ हजार कुणबी प्रमाणपत्रधारक

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील विविध शासकीय खात्यांतर्गत २ कोटी २१ लाख ६० हजार ८८९ दस्तऐवज तपासल्यानंतर २ लाख ५६ हजार ५०५ जणांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली. १ ऑक्टोबर २०२३ ते ११ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. १ हजार ८८४ गावांतील सर्व प्रकारच्या नोंदी तपासल्या. २ सप्टेंबरनंतर विभागात १७ हजार ९४६ प्रमाणपत्रे नव्याने दिली. ३६८ गावांमध्ये ६१० नव्याने नोंदी सापडल्या.

मराठवाड्यातील ८५५० पैकी १८१४ गावांत कुणबी नोंदी आढळल्या. शासनाने २ सप्टेंबरला एक अध्यादेशाद्वारे हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ज्या गावांत नोंदी आढळल्या नाहीत, तेथील मराठा समाजबांधवांना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक या गावपातळीवरील समितीमार्फत १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी संबंधित क्षेत्रात रहिवासी असल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर प्रमाणपत्रे दिली जात आहेत. समिती व सक्षम अधिकारी जात प्रमाणपत्र अर्जासंबंधी चौकशीनंतर जातीचा दाखला देत असल्याचा दावा प्रशासन करीत आहे.

२ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर ३६८ गावांत कुणबी नोंदी सापडल्या. २ सप्टेंबरपूर्वी १ हजार ५१६ गावांत नोंदी सापडल्या. १७ हजार ९४६ प्रमाणपत्रे मागील अडीच महिन्यांत नव्याने दिली. २ सप्टेंबरपर्यंत २ लाख ३८ हजार ५५९ कुणबी प्रमाणपत्रे दिली होती. ११ नोव्हेंबरपर्यंत २ लाख ५६ हजार ५०५ प्रमाणपत्रे दिल्याचा आकडा प्रशासनाने कळविला.

२ कोटी २१ लाख ६० हजार दस्तऐवज चाळलेसंयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विलीन झाल्यानंतर पहिल्यांदाच विभागातील १३ प्रकाराचे २ कोटी २१ लाख ६० हजार ८८९ दस्तऐवज तपासले गेले.

किती कुणबी नोंदी सापडल्या? ४८ हजार ४५५

किती कुणबी प्रमाणपत्रे दिली?१ ऑक्टोबर २०२३ ते २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत २ लाख ३८ हजार ५५९ कुणबी प्रमाणपत्रे दिली.२ सप्टेंबर २०२५ ते ११ नोव्हेंबर २०२५ पर्यंत १७ हजार ९४६ प्रमाणपत्रे नव्याने दिली.मराठवाड्यात आजवर एकूण २ लाख ५६ हजार ५०५ प्रमाणपत्रे दिली.

किती प्रमाणपत्रे ठरली वैध? ८ हजार ५००पडताळणी समितीकडे किती अर्ज शिल्लक? ७०१

प्रमाणपत्र अवैध ठरविण्याची कारणेजात नोंद पुरावे सादर न करणे, वंशावळ सिद्धतेचे पुरावे नसणे, जातीचा सबळ पुरावा नसणे. नाते सिद्ध न करणे, प्रमाणित प्रती न देणे.

जिल्हा...............................प्रमाणपत्रांची संख्याछत्रपती संभाजीनगर...................२०३६७जालना...................................१५३३४परभणी...................................१३६५७हिंगोली..................................९५७१नांदेड....................................४४६१बीड......................................१७५७९६लातूर...................................२३१५धाराशिव..............................१५००४एकूण.................................२५६५०५

English
हिंदी सारांश
Web Title : Hyderabad Gazette Effect: 17,946 New Kunbi Certificates in Marathwada

Web Summary : Marathwada issued 17,946 new Kunbi certificates in two months after Hyderabad Gazette implementation. Over 2.5 lakh certificates have been issued after scrutiny of documents.
टॅग्स :Marathwadaमराठवाडाkunbiकुणबीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMaratha Reservationमराठा आरक्षण