शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद गॅझेट, सगेसोयरेबाबत लवकरच ‘जीआर’ निघणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:28 IST

मराठा समाजाने सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद गॅझेट, सगेसोयरे यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) काढण्याचे काम सुरू आहे. शिवाय, सरकारने शिंदे समिती नेमल्यामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न असून, यावर शिंदे समिती व इतर समित्यादेखील काम करत आहेत. समाजाची दिशाभूल होणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्याचे काम सरकार करेल. त्यामुळे मराठा समाजाने शासनाला सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केले.

१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. हैदराबाद गॅझेट लागू करावे, सगेसोयरेसंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा, आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे - पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांच्या या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले, हैदराबाद गॅझेट, सगेसोयरे यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) काढण्याचे काम सुरू आहे. लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत सर्वांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे.

४५ पैकी २९ हजार कोटींची कामेगेल्यावर्षी मराठवाडा येथील मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केलेल्या ४५ हजार कोटींच्या पॅकेजपैकी २९ हजार कोटींची कामे सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, मराठवाड्यात अनेक उद्योगांशी करार केलेले आहेत. या विभागाला खूप काही देण्याचा प्रयत्न सरकारने केला. विविध योजनांमुळे मराठवाड्यामध्ये अनेक बदल आगामी काळात दिसतील.

महामंडळांवरून संषर्घ नाहीमहायुतीतील घटक पक्षांना महामंडळाचे समान वाटप झाले आहे. महायुतीमध्ये कुठलाही संघर्ष झालेला नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना बहिणी जोड्याने मारतील. येणाऱ्या काळामध्ये विविध कल्याणकारी योजना, सरकारने घेतलेले निर्णय आणि आजपर्यंत केलेल्या विकासकामांची पोचपावती महायुतीला निवडणुकीत मिळेल. विधानसभेच्या जागा वाटपात समन्वय असेल. आमच्यात कुठलाही वाद नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणMarathwadaमराठवाडा