पत्नीचा खून करणारा पती अखेर गजाआड

By Admin | Updated: May 23, 2014 01:09 IST2014-05-23T00:56:44+5:302014-05-23T01:09:43+5:30

औरंगाबाद : झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात गॅस सिलिंडरने प्रहार केला.

The husband who murdered his wife is finally gone | पत्नीचा खून करणारा पती अखेर गजाआड

पत्नीचा खून करणारा पती अखेर गजाआड

औरंगाबाद : झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात गॅस सिलिंडरने प्रहार केला. पत्नी मेल्याची खात्री पटल्यानंतर बाहेरून कडी लावून फरार झालेला पती आज गुरुवारी तब्बल ९ दिवसांनंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. राजेंद्र कारभारी शेळके (३०, मूळ रा. घायगाव धामोरी, ता. गंगापूर, ह.मु. मुकुंदवाडी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. पत्नीचा खून केल्यानंतर तो फरार झाला होता. लाल रंगाची मोटारसायकल घेऊन सतत गाव बदलत होता. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन घेऊन त्याला पकडण्याचा बराच प्रयत्न केला; पण यश येत नव्हते. आज गुरुवारी पोलिसांनी मोबाईल लोकेशननुसार रेल्वेस्टेशन परिसरात शोधमोहीम सुरू केली. या परिसरातील लॉज, हॉटेल, धर्मशाळा, बाजारपेठांमध्ये शोध घेतला; पण तो कोठेही आढळून येत नव्हता. शेवटी पोलीस परत फिरले तेव्हा त्यांना आरटीओ कार्यालयाजवळ त्याची मोटारसायकल उभी दिसली. त्यांनी आरटीओ कार्यालय पिंजून काढले. तो तेथेही आढळला नाही. शेवटी रेल्वेस्टेशनमध्ये जाऊन पाहणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. तेव्हा तो तेथे झोपलेला दिसला. पोलिसांनी त्याला अटक करून मुकुंदवाडी ठाणे गाठले. मुकुंदवाडी परिसरात स्वराजनगर येथे बुधवार, दि. १५ मे रोजी त्याने आपली पत्नी मीना राजेंद्र शेळके (२७) हिचा खून केला होता. चारित्र्याच्या संशयाचे भूत त्याचा पिच्छा सोडत नव्हते. त्याने अतिशय निर्दयीपणे पत्नी मीना हिचा खून केला. खून केल्यानंतर त्याला आपल्या दीड वर्ष वयाच्या मुलाचीही दया आली नाही. प्रेताजवळ मुलाला सोडून त्याने दरवाजाची बाहेरून कडी लावली व तो निघून गेला. या कृत्यामुळे वैशाली (७), साक्षी (५) व ऋषिकेश (दीड वर्ष) अशी तीन चिमुकले अनाथ झाले आहेत. सध्या ही मुले आपल्या आजोबाकडे आहेत.

Web Title: The husband who murdered his wife is finally gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.