पती जागीच ठार; पत्नी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:00 IST2017-09-11T01:00:04+5:302017-09-11T01:00:04+5:30

तलाववाडी येथे सत्संगासाठी जाणाºया दुचाकीस्वार दाम्पत्यास कारने वेरूळ लेणीसमोरील वाहनतळाजवळ जोरदार धडक दिली. यात पतीचा घाटी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली.

 Husband killed on the spot; Wife seriously injured | पती जागीच ठार; पत्नी गंभीर जखमी

पती जागीच ठार; पत्नी गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : तलाववाडी येथे सत्संगासाठी जाणाºया दुचाकीस्वार दाम्पत्यास कारने वेरूळ लेणीसमोरील वाहनतळाजवळ जोरदार धडक दिली. यात पतीचा घाटी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. रविवारी सकाळी ९ वाजता हा अपघात झाला.
तालुक्यातील पळसवाडी येथील रावसाहेब शंकर म्हसरूप (६५) व त्यांची पत्नी तुळसाबाई रावसाहेब म्हसरूप (६०) हे खुलताबादहून सकाळी मोपेड लुनावर (क्र. एम.एच. २० इ.क्यू. ५२०४) तलाववाडी येथे सत्संगासाठी जात होते. वेरूळ लेणीसमोरील अभ्यागत केंद्रासमोरील वाहनतळासमोर समोरून येणाºया कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्यास मार असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यातील रावसाहेब म्हसरुप यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title:  Husband killed on the spot; Wife seriously injured