भरधाव कारची दुचाकीला धडक, पती-पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:37+5:302021-05-05T04:07:37+5:30

दुधड : भरधाव कारने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पती-पत्नी जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. ४) सायंकाळी साडेसहा ...

Husband and wife were injured when a speeding car hit a two-wheeler | भरधाव कारची दुचाकीला धडक, पती-पत्नी जखमी

भरधाव कारची दुचाकीला धडक, पती-पत्नी जखमी

दुधड : भरधाव कारने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पती-पत्नी जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. ४) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-जालना मार्गावरील करमाड गावाजवळ घडली. राजू हिरामण कुंडारे (५०), मीराबाई कुंडारे (४४) असे अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

राजू कुंडारे हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच २० एफई ९३२७) रोहिदास नगरकडे जात होते. या वेळी औरंगाबादहून जालनाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (क्र. एम.एच. ०२ ई.एच. १४४२) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. तर कारदेखील रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना औरंगाबादेत उपचारासाठी पाठविले. कारचालक बाळू कमलाकर सहाणे (रा. सिरसगाव मंडप, ता. भोकरदन) यास करमाड पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास जमादार संतोष पाटील, विजयसिंग जारवाल करीत आहेत.

फोटो : करमाडजवळ झालेल्या अपघातात अपघातग्रस्त कार व दुचाकी.

040521\img_20210504_204101_1.jpg

अपघातानंतर कार दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली होती

Web Title: Husband and wife were injured when a speeding car hit a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.