पोलिसांशी हुज्जत; महिला वकिलाविरोधात गुन्हा

By Admin | Updated: August 20, 2016 01:16 IST2016-08-20T01:06:43+5:302016-08-20T01:16:06+5:30

औरंगाबाद : आरोपी भावाला अटक करण्यासाठी घरी आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी महिला वकिलाविरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hunt for Police; Crime against women advocates | पोलिसांशी हुज्जत; महिला वकिलाविरोधात गुन्हा

पोलिसांशी हुज्जत; महिला वकिलाविरोधात गुन्हा

औरंगाबाद : आरोपी भावाला अटक करण्यासाठी घरी आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी महिला वकिलाविरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ आॅगस्ट रोजी शहानूरवाडी परिसरातील शम्सनगर येथे घडली.
अ‍ॅड. कविता शिरसाट असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, कविता यांचा भाऊ संदीपच्या विरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक धरमसिंग सुदरडे आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक गुरुवारी रात्री शम्सनगर येथील संदीप यांच्या घरासमोर गेले.
यावेळी तपास अधिकाऱ्यांनी संदीप यांचा शोध घेण्यासाठी आल्याचे अ‍ॅड. कविता यांना सांगितले असता त्यांनी तुमच्याकडे वॉरंट आहे का, असे म्हणून पोलिसांसोबत हुज्जत घातली. यावेळी अधिकाऱ्यांसोबत अरेरावी करून शासकीय कामात त्यांनी अडथळा निर्माण केल्याबाबत उपनिरीक्षक सुंदरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Hunt for Police; Crime against women advocates