कंपनीसमोरुन दीड लाखांचा ट्रक पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:33 IST2019-03-30T23:33:40+5:302019-03-30T23:33:53+5:30
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील नहार इंजिनिअरिंग कंपनीच्या गेटसमोर उभा केलेला ट्रक चोरट्यांनी पळविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे.

कंपनीसमोरुन दीड लाखांचा ट्रक पळविला
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील नहार इंजिनिअरिंग कंपनीच्या गेटसमोर उभा केलेला ट्रक चोरट्यांनी पळविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे.
नितीन बालाप्रसाद जैस्वाल (३७, रा. शिवनेरी कॉलनी, रांजणगाव) यांनी त्यांचा ट्रक (एमएच-०४, डीडी- ४४३२) वाळूज औद्योगिक क्षेत्रातील नहार इंजिनिअरिंग कंपनीत भाड्याने लावला आहे. ट्रकचालक खंडू याने २४ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ट्रक कंपनीच्या गेट बाहेर उभा केला होता. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ७ वाजता हा ट्रक गायब असल्याचे दिसून आले. परिसरात शोध घेतला असता ट्रक कुठेच मिळून आला नाही. अखेर जैस्वाल यांनी शुक्रवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.