शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींचे बील रोखले

By admin | Updated: December 5, 2014 00:55 IST

बीड : पाणीपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जीपीएस यंत्रणेला फाटा देणाऱ्या शासकीय कंत्राटदाराला जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे़

बीड : पाणीपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जीपीएस यंत्रणेला फाटा देणाऱ्या शासकीय कंत्राटदाराला जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे़ गतवर्षी पाणीपुरवठा केलेले तब्बल दीड कोटी रुपयांचे बील रोखले असून, बील अदा करण्यासंदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे़गतवर्षी देखील जिल्ह्यात टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती़ मात्र शासनाच्या आदेशानुसार पाणी पुरविणाऱ्या टँकरवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करणे बंधनकारक केले होते़ एप्रिल, मे २०१४ अशा दोन महिन्यांमध्ये जीपीएस यंत्रणा न बसविताच टँकर सुरू होते़ या कालावधीत तब्बल १२८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता़ याबाबतचा तालुकानिहाय टँकरचा अहवाल व जीपीएस बसविलेल्या टँकरच्या खेपांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय कार्यालयाकडे जात होता़ मात्र या दोन महिन्यामध्ये जीपीएस यंत्रणा न बसविताच टँकर सुरू होते़ जीपीएसकडे पाठ फिरवल्यामुळे ठेकेदाराचे दीड कोटी रुपयांचे बील जिल्हा परिषदेने अडकवून ठेवले आहे़ जीपीएस यंत्रणेअभावी बील अदा करता येत नाही़ त्यामुळे हे बील रोखल्याचे सांगितले जात आहे़दरम्यान, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सीईओंमार्फत पत्र लिहून जीपीएस डावलणाऱ्या कंत्राटदाराच्या बील अदा करण्यासंदर्भात नेमके काय करायचे ? याची विचारणा केली होती़ मात्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यास सांगितले होते़ त्यानुसार सीईओंनी २ आॅगस्ट २०१४ रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिवांना पत्र लिहून मार्गदर्शन मागविले होते़ मात्र या पत्राला अद्याप कुठेलच उत्तर मिळालेले नाही़५६ लाख रुपये आलेटंचाई काळात उपाययोजनांसाठी जिल्हापरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ या निधीतून संभाव्य परिस्थिती हाताळण्यात येणार आहे़स्मरणपत्र पाठविणारग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ व्ही़ चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, जीपीएस बसविणे पुरवठादारांसाठी बंधनकारक होते़ मात्र दोन महिने जीपीएसविनाच टँकर धावले़ जीपीएस जिल्ह्यात उपलब्ध नाही़ पुण्याहून मागवावी लागते, असा युक्तिवाद पुरवठादाराने केलेला आहे़ मात्र नियमानुसार जीपीएसशिवाय टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला बील अदा करता येत नाही़ त्यामुळे शासनाकडे मार्गदर्शन मागविलेले आहे़ अद्याप कुठल्याच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत़ त्यामुळे पुन्हा एकदा उपसचिवांना स्मरणपत्र पाठविण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले़विहिरी होणार नियमित२०१२ मध्ये दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी बुडीत क्षेत्रात १०६ विहिरी खोदल्या होत्या़ या विहिरील पाणी संबंधित गावांमध्ये पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी दिली़ (प्रतिनिधी)४गतवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाने खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा लिलाव केला होता़४यात हरी घुमरे यांना कंत्राट देण्यात आले होते़४तब्बल सात कोटी रूपये इतकी रक्कम नियमित देयकांपोटी शासनाकडून येणे बाकी आहे़४जीपीएस यंत्रणेअभावी रोखलेल्या बिलांचा आकडा दीड कोटी रूपयांच्या घरात असल्याचे सूत्रांनी सांगितले़काय आहे ‘जीपीएस’ ?४टंचाई काळाचा फायदा घेऊन पाणीपुरवठ्याच्या जादा खेपा दाखूवन बिले लाटण्याचा प्रकार सर्रास घडत होता़४त्याला आळा घालण्यासाठी जीपीएस ची निर्मिती झाली़४ही यंत्रणा टँकरवर बसविली गेली़४त्यामुळे नेमक्या खेपा किती झाल्या ? टँकर संबंधित गावामध्ये पोहचले काय ? नेमके अंतर किती ? याबाबतची माहिती इंटरनेच्या माध्यमातून मिळत होती़४त्याचे नियंत्रण जिल्हा कक्षातून होत होते़