बारावीच्या निकालात १६ टक्क्यांनी वाढ

By Admin | Updated: June 3, 2014 00:47 IST2014-06-03T00:34:24+5:302014-06-03T00:47:08+5:30

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेत यंदा जिल्ह्याचा निकाल ८८़७५ टक्के लागला आहे़

HSC results increase by 16% | बारावीच्या निकालात १६ टक्क्यांनी वाढ

बारावीच्या निकालात १६ टक्क्यांनी वाढ

 उस्मानाबाद : शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याने आघाडी घेतल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालातून दिसून आले़ महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेत यंदा जिल्ह्याचा निकाल ८८़७५ टक्के लागला आहे़ निकालात मुलींनी पुन्हा बाजी मारली असून, जिल्ह्यातील १४ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे़ तर तब्बल ६५ महाविद्यालयांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक आहे़ बारावीच्या निकालात यावर्षी तब्बल १५़७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे़ शहरासह जिल्हाभरातील शहरी भाग, मोठ्या गावातील नेट कॅफेसह विविध कार्यालयात आपापल्या पाल्यांसह नातलगांचे निकाल पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती़ यंदा जिल्ह्यातील एकूण १३ हजार ६९९ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती़ यातील १३ हजार ६२२ जणांनी परीक्षा दिली़ यातील १२ हजार १२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ यात ६७७७ मुले उत्तीर्ण झाली असून, त्यांची टक्केवारी ८५़७४ टक्के आहे़ तर ५७५८ परीक्षा दिलेल्यांपैकी ५३४८ मुली उत्तीर्ण झाल्या असून, त्यांची उत्तीर्णची टक्केवारी ९२़८८ टक्के आहे़ तालुकानिहाय निकाल पाहता लोहारा तालुक्यातील मुलांनी यंदा बाजी मारली आहे़ लोहारा तालुक्याचा ९२़४४ टक्के निकाल लागला आहे़ तर भूम तालुक्याचा सर्वात कमी ८३़८७ टक्के निकाल लागला आहे़ निकालात तुळजापूर तालुका ९०़३८ टक्क्यांनी दुसर्‍या क्रमांकावर, उमरगा तालुका ८९़९१ टक्क्यांनी तिसर्‍या क्रमांकावर, उस्मानाबाद तालुका ८८़९२ टक्क्यांनी चौथ्या क्रमांकावर, परंडा तालुका ८७़२० टक्क्यांनी पाचव्या क्रमांकावर, वाशी तालुका ८५़६८ टक्क्यांनी सहाव्या क्रमांकावर तर कळंब तालुका ८४़७२ टक्क्यांनी सातव्या क्रमांकावर आहे़ शाखा निहाय निकालामध्ये विज्ञान शाखेचा ८७़७१ टक्के, कला शाखेचा ८८़६९ टक्के, कॉमर्सचा ९२़३१ टक्के, एचएससी़ व्होकेश्नलचा ८९़२३ टक्के निकाल लागला आहे़ बारावीचा निकाल लागल्यानंतर दुपारी एक वाजल्यानंतर शहरातील नेटकॅफेसह ठिकठिकाणी निकाल घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली़ पास झालेल्या मुलांसह त्यांच्या पाल्यांनी मिठाई खरेदीसाठी मिठाईच्या दुकानातही मोठी गर्दी केल्याचे दिसून आले़ (प्रतिनिधी) मागील दोन वर्षातील तालुकानिहाय निकाल तालुका२०१२-१३२०१३-१४ उस्मानाबाद८६़९८ %८८़९२ % भूम७८़८६ %८३़८७ % कळंब८२़१५ %८४़७२ % लोहारा८२़५७ %९२़४४ % उमरगा ८१़८९ %८९़९१ % परंडा ८२़०४ %८७़२० % तुळजापूर८०़३१ %९०़३८ % वाशी८७़०५ %८५़६८ % एकूण७२़९७ %८८़७५ % रिपीटर ७९़१७ टक्के बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यामध्ये रिपीटरही आघाडीवर असल्याचे दिसत आहे़ जिल्ह्यातील ७३ पुनर्परीक्षार्थींनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज केले होते़ यातील ७२ जणांनी परीक्षा दिली असून, यातील ५७ जण उत्तीर्ण झाले आहेत़ रिपीटर उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७९़१७ टक्के आहे़

Web Title: HSC results increase by 16%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.