बारावीच्या उत्तरपत्रिका लिहून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश!

By Admin | Updated: March 19, 2016 00:48 IST2016-03-19T00:31:18+5:302016-03-19T00:48:06+5:30

जालना : बारावीच्या विविध विषयांच्या २ हजार ५०० कोऱ्या उत्तरपत्रिका आणि तेवढेच हॉलोक्राफ्ट जप्त करत पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा जालन्यात रॅकेटचा पर्दाफाश केला.

HR batch written by HSC exams exposed! | बारावीच्या उत्तरपत्रिका लिहून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश!

बारावीच्या उत्तरपत्रिका लिहून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश!


जालना : बारावीच्या विविध विषयांच्या २ हजार ५०० कोऱ्या उत्तरपत्रिका आणि तेवढेच हॉलोक्राफ्ट जप्त करत पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा जालन्यात रॅकेटचा पर्दाफाश केला. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, या प्रकरणातील सहभागी असलेल्यांना तात्काळ अटक करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
गत आठवड्यापासून तालुका जालना पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती मिळाली होती. या आधारे पोलिसांनी अंबड रस्त्यावरील संस्कार निवासी वसतीगृहावर दोन दिवस पाळत ठेवली. उत्तरपत्रिका लिहीत असल्याची माहिती मिळताच शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पोलिस कॉन्सटेबल यशवंत मुंडे, कल्याण आटोळे आणि कृष्णा चव्हाण यांनी छापा टाकून वसतीगृहाचा व्यवस्थापक आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
कन्नड तालुक्यातील पिशोर येथील योगीराज महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर सोनवणे हे बारावीचे पेपर या संस्कार निवासी वसतीगृहात नव्याने लिहिण्यासाठी पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. वसतीगृहाचा व्यवस्थापक श्रीमंत वाघ हा अंबड, राजूर आणि शेवगा येथील विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्याकडून नव्याने उत्तरपत्रिका लिहून घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून या वसतीगृहात उत्तरपत्रिका येत असल्याची माहिती सूत्रांनी
दिली. वाघ हा विद्यार्थ्यांंना उत्तरपत्रिका लिहिण्याचा मोबदला म्हणून प्रती उत्तरपत्रिका २५ रूपये देत होता, तर स्वत: ३५ हजार रूपये घेत असल्याची माहिती पोलीसांनी दिली. धाड टाकलेल्या ठिकाणी पोलिसांना २५०० लिहिलेल्या उत्तरपत्रिका आणि ५००० कोऱ्या उत्तरपत्रिका व तितकेच हॉलोक्राफ्ट जप्त करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी दिक्षीतकुमार गेडाम यांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका जालना पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)

Web Title: HR batch written by HSC exams exposed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.