योजना राबविलेली गावे टंचाईत कशी?
By Admin | Updated: April 29, 2015 00:54 IST2015-04-29T00:28:42+5:302015-04-29T00:54:34+5:30
बीड : कोट्यावधी रूपये केवळ पाणी पुरवठा योजनावर खर्च करूनही प्रत्येक वर्षी तीच ती गावे टंचाईमध्ये येतातच कशी? असा सवाल पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव महेश सावंत यांनी उपस्थित केला.

योजना राबविलेली गावे टंचाईत कशी?
बीड : कोट्यावधी रूपये केवळ पाणी पुरवठा योजनावर खर्च करूनही प्रत्येक वर्षी तीच ती गावे टंचाईमध्ये येतातच कशी? असा सवाल पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव महेश सावंत यांनी उपस्थित केला.
बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात सोमवारी पाणी टंचाई आडवा बैठक सावंत यांनी घेतली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कक्ष अधिकारी मुंबई राजेंद्र कुमठगी, जि. प. सीईओ नामदेव ननावरे, ग्रामीण पुरवठा अधिकारी एस. व्ही. चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मागील तीन वर्षापासून जिल्हयात दुष्काळी परिस्थिती आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांवर कोट्यावधी रूपयांचा चुराडा झालेला आहे. ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून पाणी पुरवठ्याच्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत. तीच गावे पुन्हा २०१५ च्या दुष्काळी गावांमध्ये असल्याचे निदर्शनास आल्याने पाणी पुरवठा विभागाचे उपसचिव यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)