शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात जलकुंभ किती? एवढ्या उंचीवर जाऊन केव्हा करतात स्वच्छ?

By मुजीब देवणीकर | Updated: July 18, 2024 14:48 IST

जलकुंभावरच स्वच्छ केल्याच्या प्रत्येक ठिकाणी ठेवल्या जातात नोंदी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सुमारे १५ लाख नागरिकांची तहान महापालिकेच्या पाण्यावर भागते. त्यासाठी शहरात ३६ जलकुंभांचा वापर करण्यात येतो. हे उंच जलकुंभ कधी स्वच्छ होतात, असा प्रश्न पडतो. गढूळ पाणी आल्यावर नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येतात. महापालिकेकडून दर तीन महिन्यांनी जलकुंभांची स्वच्छता केली जाते.

शहरात काही वसाहतींना पाचव्या तर काही वसाहतींना दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. जायकवाडीहून शहरात दररोज १३० एमएलडी पाणी येते. वेगवेगळ्या जलकुंभांवर हे पाणी आणण्यात येते. तेथून टप्पे पाडून नागरिकांना पाणी देण्यात येते. पहाटे ४ वाजेपासून पाणीपुरवठ्याचे टप्पे सुरू होतात. रात्री १:०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात पाणी आणण्यापूर्वी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातच पाणी स्वच्छ केले जाते. त्याच ठिकाणी क्लोरिन किती टाकावे, हे निश्चित केले जाते. महापालिकेकडून पाणीपुरवठा आठवड्यातून एकदा होतो, यावर नागरिकांचा प्रचंड रोष आहे. मात्र, पाण्याच्या गुणवत्तेवर नागरिकांनी कधीच प्रश्न उपस्थित केला नाही. काही वसाहतींमध्ये ड्रेनेजमिश्रित पाणी येते. काही ठिकाणी गढूळ पाणी येते. जलवाहिन्यांचे लिकेज, ड्रेनेजचे लिकेज निदर्शनास येताच मनपाकडून दूरही केले जातात.

शहरात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या किती?शहरात महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या एकूण ३६ पाण्याच्या टाक्या आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेत आणखी नवीन ५३ पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसांत शहरात जवळपास ८९ ते ९० जलकुंभ दिसून येतील.

किती दिवसांनंतर होते स्वच्छता?शहरातील पाण्याचे जलकुंभ प्रत्येक तीन महिन्यांनी स्वच्छ केले जातात. प्रत्येक जलकुंभात धुतलेले गढूळ पाणी काढण्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे. तीन पाण्याद्वारे जलकुंभ स्वच्छ केले जाते. शेवटी क्लोरिनच्या पाण्याचा वापर होतो.

कोणाकडून केली जाते स्वच्छता?महापालिकेचे कामयस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचारी प्रत्येक तीन महिन्याला जलकुंभ कोरडा झाला तर सफाई करतात. जलवाहिनी फुटलेली असेल तेव्हा ही कामे उरकली जातात.

घाण पाण्याला जबाबदार कोण?काही भागात ड्रेनेज-जलवाहिन्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे अनेकदा दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तक्रार येताच खोदकाम करून लिकेज बंद केले जातात. ही निरंतर प्रक्रिया असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वच्छतेला नेहमीच प्राधान्यशहरातील जलकुंभ नियमितपणे स्वच्छ करण्यात येतात. किमान ३ महिन्यांतून एकदा जलकुंभ स्वच्छ करण्याचे निर्देश आहेत.- के. एम. फालक, कार्यकारी अभियंता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी