खाद्यपदार्थ किती वेळ फ्रीजमध्ये चांगले राहतील?
By | Updated: November 30, 2020 04:00 IST2020-11-30T04:00:02+5:302020-11-30T04:00:02+5:30
भात कोणत्याही प्रकारचे ताजे पदार्थ खाणे चांगले आहे, पण जर तुम्ही जास्त भात शिजविला असेल उरल्यावर ते फ्रीजमध्ये ठेवले ...

खाद्यपदार्थ किती वेळ फ्रीजमध्ये चांगले राहतील?
भात
कोणत्याही प्रकारचे ताजे पदार्थ खाणे चांगले आहे, पण जर तुम्ही जास्त भात शिजविला असेल उरल्यावर ते फ्रीजमध्ये ठेवले असेल तर एक ते दोन दिवसांत संपवल्यास चांगलं राहील. कारण, जास्त काळ ठेवलेला भात खाण्याने तुम्हाला त्याचे पौष्टिक घटक मिळणार नाहीत आणि यामुळे तुमची पाचनक्रिया खराब होऊ शकते.
चपाती
जर आपण चपाती बनविली आणि ती फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ती उघडे न राहता, म्हणजे भांड्यात झाकून ठेवा. तसेच आपण एक आठवडाभर चपाती फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि बाहेर काढून वेळोवेळी खाऊ शकता, परंतु असे केल्याने आपल्या आरोग्यास देखील नुकसान होऊ शकते.
डाळी
डाळी पौष्टिक असतात. जर ती ताजी खाल्ली तर शरीराला फायदा होतो. काही लोक डाळ तयार करतात आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात आणि दोन-तीन दिवस तेच खातात. अशा लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवलेल्या डाळीमुळे गॅस होऊ शकतो.