काळासोबत व्यवसायात बदल कसा कराल
By Admin | Updated: August 14, 2014 01:52 IST2014-08-14T01:34:10+5:302014-08-14T01:52:28+5:30
औरंगाबाद : आजच्या बदलत्या काळात व्यवसायाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. दररोज नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहे व त्यानुसार स्वत:चा व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवावा लागत आहे.

काळासोबत व्यवसायात बदल कसा कराल
औरंगाबाद : आजच्या बदलत्या काळात व्यवसायाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. दररोज नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहे व त्यानुसार स्वत:चा व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवावा लागत आहे. अर्थात, जो व्यापारी बदलत्या काळासोबत स्वत:ला सतत अपडेट ठेवेल तोच यशस्वी होऊ शकतो. शहरातील व्यापाऱ्यांना नवी दिशा देण्यासाठी ‘बदलोगे तो बढोगे’, बदल रहा है व्यापार... क्या आप है तयार ! या विषयावर प्रख्यात बिझनेस गुरू राकेश जैन यांच्या चर्चासत्राचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.
उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदिरात शनिवार, दि. १६ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० ते १२.३० वाजेदरम्यान चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वत:च्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये व आपल्या व्यवसायामध्ये आपण बदल घडवत आहोत का? दिवस-रात्र मेहनत करूनसुद्धा आखलेल्या व्यवसायाच्या आलेखापर्यंत आपण पोहोचत आहोत का? शेवटी असे वाटते, काही तरी बदलाव घडवायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला व्यवसाय करणे सोपे होईल. आपल्या व्यवसायाची गती कशी वाढेल? बदलत्या व्यापाराच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण तयार आहोत का? या सर्व प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन बिझनेस गुरू करणार आहेत. हे चर्चासत्र आपल्या जीवनात परिवर्तन घडवू शकते. इच्छुकांनी चर्चासत्र सुरू होण्याच्या १० मिनिटे अगोदर रंगमंदिरात हजर राहावे, असे आवाहन भारतीय जैन संघटना औरंगाबाद, जिल्हा व ग्रामीण शाखा, जैन सोशल ग्रुप, जितो मराठवाडा चॅप्टर, महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटी, जैन इंजिनिअर्स सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर लोकमत आहे.