शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

चंपा चौक ते जालना रोड १०० फुटांचा रस्ता नवीन विकास आराखाड्यात ६० फूट कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 19:37 IST

विकास आराखड्यानुसार हा रस्ता १०० फूट केलाच नाही. मागील २० वर्षांत अनेकदा रस्ता १०० फूट रुंद करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले.

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील बहुचर्चित चंपा चौक ते जालना रोड हा रस्ता १०० फूट रुंद असताना नवीन विकास आराखड्यात चक्क ६० फूट करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे महापालिकेने जुन्या विकास आराखड्याने १०० मीटरवर अनेक मालमत्ताधारकांना टीडीआरही दिले आहेत. संतप्त नागरिक महापालिकेच्या नगररचना विभागात येऊन विचारणा करीत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंचायत समिती कार्यालयापासून चंपा चौकापर्यंत १०० फूट रस्ता आहे. पुढे हा रस्ता अत्यंत निमुळता होत गेला. विकास आराखड्यानुसार हा रस्ता १०० फूट केलाच नाही. मागील २० वर्षांत अनेकदा रस्ता १०० फूट रुंद करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले. कैलासनगर, दादा कॉलनी इ. भागांत रस्त्यावर नागरिकांची घरे आहेत. जवळपास ६०० ते ७०० घरे जमीनदोस्त केली, तरच रस्ता होऊ शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात घरे का पाडावी? म्हणून यापूर्वीच्या मनपा आयुक्तांनी ‘यु टर्न’ घेतला. प्रशासक जी. श्रीकांत यांनी हा रस्ता करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भूमापन कार्यालयाला संयुक्त मोजणीसाठी पैसेही भरले. नव्याने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात हा रस्ता १०० फूटच होता.

विकास आराखड्यात बदलविकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविल्यानंतर शासन स्तरावर आराखड्यात आमूलाग्र बदल करण्यात आले. त्यात चंपा चौक ते जालना रोड या रस्त्यातील बहुतांश भाग १०० वरून ६० फूटच करण्यात आला. जिन्सी मनपा आरोग्य केंद्रापासून जालना रोडवर रेमंड शोरूमपर्यंत रस्ता ६० फूट केला. चंपा चौक ते जिन्सी चौक रस्ता १०० फूटच ठेवला.

मनपाने दिले टीडीआरमहापालिकेने जुन्या विकास आराखड्यानुसार या रस्त्यावर अनेक मालमत्ताधारकांना टीडीआरही दिले. नागरिकांनी मालमत्ता महापालिकेकडे सोपविल्या. आता अतिरिक्त जागेचे मनपा काय करणार, हा मोठा प्रश्न आहे.

‘कभी खुशी कभी गम’चंपा चौक ते जालना रोड हा रस्ता १०० फूट व्हावा, अशी काही नागरिकांचीही मागणी आहे. १०० फुटात ज्यांच्या मालमत्ता जात होत्या, त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. रस्ता ६० फूट ठेवावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

बदल रद्द हाेऊ शकतोशासनाने आराखड्यात केलेले बदल सुनावणीसाठी ठेवले आहेत. त्यामध्ये भविष्यात बदल करता येऊ शकतो, असे सहसंचालक नगररचना मनोज गर्जे यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर