शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

औरंगाबादमध्ये रात्री साडेअकरापर्यंत सुरू राहणार हॉटेल, रेस्टारंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 7:26 PM

३ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पालिका हद्दीतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट या आस्थापना सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत खुल्या राहतील.

ठळक मुद्देसामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी असणार नाही.सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल व त्यासारखी स्थळे बंदच राहतील.

औरंगाबाद : शहरातील हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिली आहे. मिशन बिगिन अगेनअंतर्गत राज्य शासनाने ३ ऑक्टोबरपासून नवीन आदेश काढले आहेत. या आदेशानुसार हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचाच संदर्भ देत पाण्डेय यांनी औरंगाबाद शहरासाठी स्वतंत्र आदेश काढले आहेत. शहरात आठवडी बाजार, जनावरांचा बाजार आणि व्यावसायिक प्रदर्शन सुरू करता येईल. 

या आदेशात म्हटले आहे की, ३ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पालिका हद्दीतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट या आस्थापना सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत खुल्या राहतील. अन्य व्यापारी आस्थापने सकाळी सात ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू राहतील. महापालिका क्षेत्रातील सर्व औद्योगिक व उत्पादक युनिटस्मध्ये अत्यावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंचे उत्पादन सुरू करण्यास परवानगी असेल. सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल व त्यासारखी स्थळे बंदच राहतील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी असणार नाही.

खेळांच्या फक्त सरावासाठी परवानगी औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील मैदानी खेळ जसे की, क्रिकेट, खो-खो, इनडोअर गेम बॅडमिंटन, लॉनटेनिस या खेळांच्या फक्त सरावासाठी परवानगी देण्यात येत आहे. क्रीडा स्पर्धा घेणे, उपक्रम राबवणे, संमेलन घेणे याला बंदीच राहणार आहे. या खेळांचा सराव करण्यासाठीच्या जागी गर्दी टाळावी. सरावासाठी आवश्यक तेवढ्याच खेळाडूंना प्रवेश देण्यात यावा. दहा वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये. सरावास येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार