गारपीट अर्थसाहाय्याचे कन्नड तालुक्याला मिळाले १ कोटी ७० लाख
By Admin | Updated: March 22, 2016 01:29 IST2016-03-22T00:45:20+5:302016-03-22T01:29:19+5:30
कन्नड : जून २०१४ व एप्रिल २०१५ मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकाचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य

गारपीट अर्थसाहाय्याचे कन्नड तालुक्याला मिळाले १ कोटी ७० लाख
कन्नड : जून २०१४ व एप्रिल २०१५ मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकाचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्यासाठी कन्नड तालुक्याला १ कोटी १७ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. तथापि शासकीय सुट्यांमुळे याद्या बनविण्याच्या कामास विलंब होत आहे.
जून २०१४ मध्ये वादळी वारे व गारपिटीमुळे १६ गावांना तडाखा बसला होता. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. त्यानुसार नेवपूर, रेऊळगाव व रोजवेपूर येथील १४ शेतकऱ्यांच्या बागायती क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्यासाठी ४४ हजार १०० रुपये प्राप्त झाले आहेत, तर नागद, बेलखेडा, हरसवाडी, लोंजा, पांगरा, बोपेवाडी, सायगव्हाण, बोरमळीतांडा, नागदतांडा, नेवपूर, रेऊळगाव, रोजवेपूर, वडगाव (जा), बालखेडा व सोनवाडी गावातील ८७.८० हेक्टर वरील बाधित फळपिकांसाठी २०२ शेतकऱ्यांसाठी १० लक्ष २९ हजार ६०० रुपयांचे अर्थसाहाय्य प्राप्त झाले आहे.