शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

गारपीट मदतीचे वाटप

By admin | Updated: June 23, 2014 00:26 IST

जाफराबाद : तालुक्यातील २९ गावांचे गावनिहाय गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपाचे काम सुरू आहे.

जाफराबाद : तालुक्यातील २९ गावांचे गावनिहाय गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपाचे काम सुरू आहे. पहिला व दुसरा हप्ता मिळून एकूण ९ हजार ३६० पात्र लाभार्थ्यांसाठी ४ कोटी ३८ लाख ४६ हजार रुपये मदत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाफराबाद शाखेमध्ये जमा आहे. उपलब्ध मदतीपैकी पहिल्या हप्त्यात १ कोटी ७९ लाख ४२ हजार रुपये वाटप झाले आहे.गारपीट अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचा फायदा ३ हजार ५२७ शेतकऱ्यांना झाला असून, दुसऱ्या हप्त्यामध्ये २ कोटी ५९ लाख ४ हजार रुपये ५ हजार ८३३ शेतकऱ्यांना होणार आहे. याकरिता शासनाच्या वतीने गारपीट अनुदान तरतूद करून देण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा व्यवहार संगणकीकृत झाल्याने याचा फायदादेखील लाभार्थ्यांना तात्काळ मिळत आहे. ऐन खरीप पेरणीच्या वेळेस अनुदान मिळाल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.पहिल्या हप्त्यामध्ये विरखेडा भालकी, सावंगी, खासगाव, पिंपळखुटा, कुंभारी, नळविहरा, निमखेडा, टाकळी, सावरखेडा, वरखेडा, रेपाळा, खामखेडा येथील ३ हजार ५२७ लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. दुसऱ्या हप्त्यामध्ये रूपखेडा, गोकुळवाडी, आरदखेडा, बोरगाव मठ, बोरी खुर्द, हरपाळा, चिंचखेडा, हिवराबळी, बोरगाव बु. बोरखेडी, जवखेडा ठेंग, गोंधनखेडा, मेरखेडा, देऊळगाव उगले, जानेफळ पंडित आदी गावांचे अनुदान वाटपाचे काम सुरू आहे.दुसऱ्या टप्प्यामध्ये ५ हजार ८३३ पात्र लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. अनुदान वाटपाच्या कामी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश राऊत, प्रमुख भाग चौकसनीस माधवराव भोपळे, संजय उबरहंडे यांचे सहकार्य लाभत आहे. (वार्ताहर)कर्ज योजनेचा लाभ घ्यावाशासनाच्या पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज वाटप करण्यात आले असताना सदरील कर्ज लाभधारक शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी भरणा केल्यास अशा शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख पीक कर्जमाफी योजनेचा फायदा होऊ शकतो. पीक कर्जाची वसुली ७ कोटी १९ लाख रुपये असून, तालुक्यात ३ हजार ८४७ कर्जदार आहेत. सदरील शेतकऱ्यांना जवळपास ३ टक्के कर्जमाफीचा फायदा घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.