शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हलच्या उघड्या डिक्कीने रिक्षा कापून काढला, दोघींचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:52 IST

बस चालकाच्या बेपर्वाईमुळे भीषण अपघात; महिला भाविकांवर परतीच्या प्रवासात काळाचा घाला

छत्रपती संभाजीनगर: धार्मिक दर्शनासाठी मध्य प्रदेशातील सिहोर येथे गेलेल्या वाळूज येथील सात महिला भाविकांचा परतीचा प्रवास अत्यंत दुर्दैवी ठरला आहे. रेल्वे स्टेशनवरून पहाटे घरी परतताना पंचवटी चौकात रिक्षाला खासगी ट्रॅव्हल बसची धडक बसली. यावेळी बसच्या उघड्या डिक्कीने रिक्षाचा मागील भाग अक्षरशः कापून निघाला आहे. या भीषण अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला, तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. 

वाळूज येथील सात महिला भाविक सिहोर येथे प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. मंगळवारी दुपारी त्या तेथून निघून पहाटे अडीच वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. स्टेशनवरून एका रिक्षाने या सात महिला वाळूजकडे निघाल्या होत्या. रिक्षा पंचवटी चौकात थांबला असताना, याचवेळी उजव्या बाजूची डिक्की उघडी असलेली एक खासगी ट्रॅव्हल बस विरुद्ध दिशेने वेगाने आली. बस चालकाने बेजबाबदारपणे आणि वेगाने वळण घेतल्यामुळे बसच्या उघड्या डिक्कीचा दरवाजा रिक्षाच्या मागच्या बाजूस जोरदार धडकला. मागची बाजू कापत बस वेगाने पुढे गेली. मात्र या भीषण धडकेत रिक्षाच्या मागे बसलेल्या चौघी महिला गंभीर जखमी झाल्या. त्यातील आशाबाई राजु चव्हाण आणि लत्ता बाई परदेशी या दोघींचा जागीच मृत्यू झाला.

घाटी रुग्णालयात उपचार सुरूइतर दोन गंभीर जखमी महिलांवर तातडीने घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. यावेळी मधल्या सीटवर बसलेल्या तीन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी चालक आणि क्लीनरला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरात एकच खळबळ उडाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Open Travel Bus Door Kills Two Women in Rickshaw Accident

Web Summary : Two women died, two injured near Sambhajinagar when a travel bus with an open luggage door collided with their rickshaw. The accident occurred as they returned from a religious trip.
टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी