शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघाताने छ. संभाजीनगर सुन्न; रिक्षा चालकासह प्रवासी महिलेचा मृत्यू, दोघींची मृत्यूशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:20 IST

''मध्यरात्रीचा तो प्रवास ठरला अखेरचा..." छत्रपती संभाजीनगरजवळ अहिल्यानगर रोडवर रक्ताचा सडा

छत्रपती संभाजीनगर: शहरातील अहिल्यानगर रोडवर मंगळवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका रिक्षाने रस्त्यात उभ्या नादुरुस्त टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक रईस हासिम शेख (३५) आणि प्रवासी महिला रुक्मिणी येणगे (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन प्रवासी तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्री १:५५ वाजता आकाश माळी यांनी फायर कंट्रोलला अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. अपघात इतका भीषण होता की रिक्षा चालक रईस शेख हे रिक्षाच्या पत्रात पूर्णपणे अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू टूल्सच्या सहाय्याने रिक्षेचा पत्रा कापून त्यांना बाहेर काढले आणि तातडीने घाटी रुग्णालयात हलवले.

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी रईस शेख आणि रुक्मिणी येणगे यांना मृत घोषित केले. जखमींमध्ये शितल मोरे (२४) आणि पायल वरदे (१९, दोघी रा. रांजणगाव, वाळूज) यांचा समावेश आहे. या दोन्ही तरुणींची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

यांनी केले बचाव कार्यमुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिकारी विजय राठोड, ड्युटी अधिकारी दीपराज गंगावणे आणि संग्राम मोरे, प्रसाद शिंदे, महेंद्र खोतकर, छत्रपती केकान, जगदीश गायकवाड, अमिताभ कराड आणि वाहन चालक चंद्रसेन गीते यांच्या पथकाने हे रेस्क्यू ऑपरेशन राबवले. या घटनेमुळे वाळूज एमआयडीसी आणि रांजणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fatal Accident Shocks Chhatrapati Sambhajinagar: Two Dead, Two Injured

Web Summary : A tragic accident in Chhatrapati Sambhajinagar claimed two lives: a rickshaw driver and a female passenger. Two young women are critically injured after their rickshaw collided with a stationary tempo. Rescue efforts were undertaken by the fire department.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी