आशावर्कर्सचा संप मिटला; सीटू भवनात आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:04 IST2021-06-24T04:04:46+5:302021-06-24T04:04:46+5:30

झालेल्या समझौत्यानुसार आशाताईंना १ जुलैपासून १५०० रु. व गटप्रवर्तकांना १७०० रुपये दरमहा वाढ मिळणार आहे. त्यापैकी माहिती संकलन व ...

Hope workers strike ends; Celebration at Situ Bhavan | आशावर्कर्सचा संप मिटला; सीटू भवनात आनंदोत्सव

आशावर्कर्सचा संप मिटला; सीटू भवनात आनंदोत्सव

झालेल्या समझौत्यानुसार आशाताईंना १ जुलैपासून १५०० रु. व गटप्रवर्तकांना १७०० रुपये दरमहा वाढ मिळणार आहे. त्यापैकी माहिती संकलन व सादरीकरण याकामी आशांना दरमहा १००० रु. व गटप्रवर्तकांना १२०० रुपये निश्चित व कायमस्वरूपी वाढ असून, ५०० रुपये कोविड प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे.

पुढील वर्षी १ जुलै २०२२ पासून आशा व गटप्रवर्तकांना ५०० रुपये निश्चित व कायमस्वरूपी वाढ मिळणार आहे.

आशांना २००० रुपये व गटप्रवर्तकांना २२०० रुपये वाढ मिळण्याचा समझौता बुधवारी करण्यात आला.

सीटू भवन येथे आशा व गटप्रवर्तक यांनी मिळून या निर्णयाचे स्वागत केले. पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. लक्ष्मण साक्रुडकर, दामोदर मानकापे, मंगल ठोंबरे, विश्वनाथ शेळके, पुष्पा पैठणे, पुष्पा सिरसाट, मीरा जाटवे, संगीता जोशी, पुष्पा काळे, सुनीता दाभाडे, सुवर्णा सिरसाट आदींनी आनंदोत्सव साजरा केला.

Web Title: Hope workers strike ends; Celebration at Situ Bhavan